Amalner

अमळनेर ते शेगांव पायीवारीचे आयोजन…

अमळनेर ते शेगांव पायीवारीचे आयोजन…

अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथील मुंदडानगर येथील प्रतिशेगांव म्हणून नावारूपास आलेले संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर यांच्या वतीने अमळनेर ते शेगांव पायी वारी चे आयोजन 9 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
9 नोव्हेंबर वार मंगळवार सकाळी 5 वाजता गजानन महाराज मंदिर मुंदडा गेटच्या समोरून पायीवारीची सुरुवात होईल त्या अगोदर सकाळी पाच वाजता महाआरती होईल असे संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष व वारी प्रमुख प्रा.आर.बी पवार यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले..
सर्व गजानन भक्तांना कळविण्यात येते की अमळनेर होऊन नव्या नव्यांदा श्री क्षेत्र शेगांव पायी वारी 9 नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता निघणार आहे तरी ज्या भक्तांना वारीत यायचे असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधून फार्म भरून प्रवेश घ्यावा असे आवाहन वारी प्रमुखांनी केला आहे.
अमळनेर ते शेगांव पायीवारी मध्ये काही सेवाभावी नागरिक व महिलांनी सकाळचा नाश्ता चहा, दुपारचे जेवण , चहा, रात्रीचा मुक्काम वारीला लागणारा औषध पुरवठा व वैद्यकीय सेवा ,पाण्याची व्यवस्था,
यासाठी सहकार्य केले आहे त्यांचे संत गजानन महाराज सेवा संस्थान अमळनेर व वारी प्रमुखांनी आभार व्यक्त केले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button