Motha Waghoda

मोठे वाघोदा येथे कोविड लसीकरण शिबीर आयोजित करा -युवा गुर्जर महासभेची मागणी वैद्यकीय अधिकारी सह प्रभारी सरपंच यांना दिले निवेदन

मोठे वाघोदा येथे कोविड लसीकरण शिबीर आयोजित करा -युवा गुर्जर महासभेची मागणी वैद्यकीय अधिकारी सह प्रभारी सरपंच यांना दिले निवेदन
मुबारक तडवी रावेर
मोठा वाघोदा : मोठा वाघोदा गावातील लोकसंख्या ९ हजारांपेक्षा जास्त असुन तसेच वृध्द व य अपंग नागरिकांना कोविड लसीकरणासाठी लॉकडाउन मुळे बाहेरगावी लसीकरण केंद्रावर जाण्यास तसेच असंख्य अडचणी व तासनतस रांगेत उभे रहावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत असून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या विविध कारणमिमांसा मुळे मोठा वाघोदा येथे गावातच लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिकारी व मा.प्रमारी सरपंच यांना युवा गुर्जर महासभेकडुन देण्यात आले. मा.वैद्यकिय अधिकारी डॉ.चंदन पाटिल यांनी मागणीची
दखल घेत येत्या तीन-चार दिवसात वाघोदा येथे शिबिराचे आयोजन केले जाईल असे आश्वासन दिले असुन मा.प्रभारी सरपंच लक्ष्मीकांत चौधरी यांनी शिबिरासाठीची पुर्ण व्यवस्था व सहकार्य ग्रामपंचायती तर्फे करण्याचे आश्वासन दिले.यावेळी युवा गुर्जर महासभचे शाखा अध्यक्ष रमाकांत महाजन,तालुका उपाध्यश तथा शाखा कार्याध्यश योगेश पाटिल,सचिव राहुल पाटिल,सपर्क प्रमुख प्रतिक महाजन, चिटनिस गोकुळ चौधरी,सदस्य अमोल चौधरी,महेश महाजन, उपकेंद्राचे आरोग्य सेवक अजित राणे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button