Nashik

निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या ठेकेदारास फेरदुरुस्ती करण्याचे आदेश –

निकृष्ट रस्ता काम करणाऱ्या ठेकेदारास फेरदुरुस्ती करण्याचे आदेश –

नाशिक शांताराम दुनबळे.

नाशिक=वाकद ते वाकद फाटा या रस्त्याचे अत्यंत नित्कृष्ठ पद्धतीने घाई घाईत काम उरकणाऱ्या ठेकेदारास ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर जि.प.बांधकाम विभागाने दणका देत फेरदुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाकद फाटा ते वाकद ०/०० ते १/५०० या रस्त्याचे सध्या नुतनीकरण चालू आहे. मात्र या रस्त्यावर अत्यंत हीन दर्जाची खडी व माती मिश्रित मुरूम वापरून घाईत घाईत काम पूर्ण करण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न होता. या बाबत येथील जागरूक नागरिक अशोक वाळुंज यांनी ठेकेदारास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ठेकेदाराने कानाडोळा करत काम सुरू ठेवले. यामुळे अशोक वाळुंज, सरपंच नलिनी गांगुर्डे यांनी याबाबत जि.प.( इ.व.द) उपविभाग, उपअभियंता ढिकले साहेब यांच्याकडे लेखी तक्रार केली. या अर्जाची दखल घेऊन त्यांनी या कामाची पाहणी केली असता त्यांना हे काम दरसुचीच्या मानकाप्रमाणे तसेच सूचनांचे पालन न करता निकृष्ट दर्जाचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी सप्तश्रृंगी कन्स्ट्रक्शन, विजय बाळासाहेब पाटील, कर्मयोगी नगर, सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर लिंक रोड, नाशिक यांना लेखी आदेश काढून मानकाप्रमाणे तसेच निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे अन्यथा त्यांचे कामाचे देयक रोखण्यात येईल असा इशारा दिला आहे.
येवला लासलगाव मतदार संघात पालकमंत्री ना.भुजबळ यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र अधिकारी व ठेकेदार यांची साखळी निर्माण झाल्याने बहुतांशी कामे मानकाप्रमाणे होत नाही असे आढळून आले आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते. देखरेख अभियंता कानाडोळा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निधी येऊनही दोन चार वर्षात रस्त्याची वाट लागते त्यामुळे मतदार संघातील निकृष्ट कामांवर ना.भुजबळ यांचा वचक असावा अशी मागणी नागरिक करत आहेत जेणेकरून निधीचा खऱ्या अर्थाने विनियोग होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button