sawada

सावदा पालिकेची अर्थसंकल्पीय ऑन लाईन सभा कलम ३०८ खाली रद्द करण्यात यावी -विरोधी गटाची पत्रकार परिषदेत मागणी!

सावदा पालिकेची अर्थसंकल्पीय ऑन लाईन सभा कलम ३०८ खाली रद्द करण्यात यावी -विरोधी गटाची पत्रकार परिषदेत मागणी!

युसूफ शाहा सावदा

सावदा : ५० पेक्षा कमी सभासद असले तर ऑफ लाईन मिटिंग घ्यावी असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना सदर मिटिंग ऑन लाईन घेण्यात आली,व या सभेमध्ये शादीखाना हॉलचा विषय ही घेण्यात आला नाही म्हणून सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक व अपक्ष नगरसेवक यानी सदरची ऑन लाईन मिटिंग ही नियमानुसार नसून, ही मिटिंग रद्द करण्यात यावी ,या करिता आम्ही कोणीही विरोधी नगरसेवक ऑन लाईन मिटींगला हजर राहिलो नाही,आणि मिटिंग वर बहिष्कार टाकला सदरची ऑन लाईन मिटिंग ही नियमानुसार नसल्याने, कलम ३०८ नुसार रद्द करण्यात यावी. अशी मागणी आम्ही केली असून, या करिता नगराध्यक्षाच्या दालनात दीड तास ठिय्या आंदोलन केले, तसेच मागील मिटिंग मध्ये तहकूब केलेला आमोदा-सावदा – पाल या रस्त्याला माजी खा.स्व,हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव या मिटिंग मध्ये घेण्याचे सांगितले होते. परन्तु हा विषय या मिटिंग मधेही घेतला नाही, असे सावदा विश्राम गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे पालिकेतील विरोधी गटनेता फिरोज खान पठाण व माजी नगराध्यक्ष,विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सांगितले,तसेच सदरची बैठक नियमानुसार नसल्याने कलम ३०८ नुसार रद्द करणे संदर्भात, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.त्याच प्रमाणे नगराध्यक्ष सौ.अनिता येवले याना निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान पालिकेची अर्थसंकल्पीय सभा सत्ताधारी नगरसेवकाच्या ऑन लाईन उपस्थितीत घेण्यात येऊन यात कोणतीही करवाढ नसलेला ६० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.बैठकित सर्वानुमते चर्चा न करता शहर विकासाचा आत्मा असलेला अर्थसंकल्प मंजूर करणे चुकीचे असल्याचे विरोधी गटातून सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button