आटपाडी

लेंगरेवाडी येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन

लेंगरेवाडी येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन

माडगुळे दि.31(प्रतिनिधी):राहुल खरात

आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
एकेकाळी दुष्काळामुळे स्थलांतरित केल्‍याने ओस पडलेले लेंगरेवाडी हे गाव, थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या लेखणीतून सातासमुद्रापार पोहोचले.आपली किर्ती केलेले बंडगरवाडी गाव तसे लहानच. या ठिकाणी संपूर्ण धनगर समाजाची लोकवस्ती आहे, थोडीफार शेती परंतु तीही पाण्यामुळेच कोरडीच. अशा ठिकाणचा मुख्य व्यवसाय हा मेंढपाळीचा. येथील लोक दहा-दहा महिने गाव सोडून इतर राज्यात मेंढपाळीसाठी जातात. त्यामुळे त्यांना शिक्षणाची संधी मिळत नसत, शाळा-कॉलेज तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहू लागली. विशेष करून मुलींना शिक्षण घेता येत नसत. हीच अडचण लक्षात घेऊन आटपाडी येथील आटपाडी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह बाप्पू देशमुख यांनी हायस्कूल काढून त्याची इमारत उभी केली. त्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माडगुळे गावचे सरपंच संजय विभूते ,बापूसाहेब विभुते ,केडरचे माजी चेअरमन मोहन विभुते,लेंगरेवाडीचे सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन मुरलीधर लेंगरे, बजरंग लेंगरे ,पांडुरंग लेंगरे, पोलीस पाटील,पांडुरंग बंडगर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button