Nashik

कोरोना संसर्गाचे नियम पाळत सरसकट शाळा उघडा व विनाअनुदानित शाळांना विनाअट सरसकट अनुदान द्या : अध्यापकभारती चे शेजवळ यांची मागणी,

कोरोना संसर्गाचे नियम पाळत सरसकट शाळा उघडा व विनाअनुदानित शाळांना विनाअट सरसकट अनुदान द्या : अध्यापकभारती चे शेजवळ यांची मागणी,

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : मानवी जीवनात शिक्षण-शाळांचे महत्व कधी नव्हे इतके जगाला कळाले आहे.महाराष्ट्र तथा देशातील शाळा महाविद्यालय मार्च २०२० पासून आजवर शाळा बंद राहिल्या आहेत. ऑनलाईन शाळा व अभ्यासाचा पुरता बोजवारा उडाला होता अशा वेळी दिनांक ४ सप्टेंबर २०२१ पासून शहरातील इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी इयत्तेचे वर्ग प्रत्यक्ष (ऑफलाईन) स्वरूपात उघडण्याची आनंदवार्ता असली तरी आता शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी (प्ले ग्रुप वगळता) प्राथमिक शाळा पासून सर्व शाळा महाविद्यालय सरसकट उघडव्यात व आयुष्याची वीस वर्षेहून अधिक काळ विणावेतन काम करणाऱ्या विनाअनुदानित शाळा-वर्ग तुकड्यावर कार्यरत शिक्षकांना विनाअट सरसकट १००% अनुदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीच्या वतीने सरकारला निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे.
प्रमुख मागण्या
१) शाळा-महाविद्यालय परिसर व बस प्रवासातील विद्यार्थी हिता करता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारी आरोग्य विभाग व केंद्र राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे.
२) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनचे (वय वर्ष १८ च्या पुढील) कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात यावे.
३) शाळा महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात यावे.
४) शाळा-महाविद्यालय परिसरातील स्वच्छता गृह व पाण्याची सुविधा जंतू विरहित करण्यात यावी व संबंधित प्रशासनाने या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे.
५) क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके त्वरित वाटप करण्यात यावीत.
६) आठवड्यातून एक दिवस दप्तर विना शाळा उपक्रम राबवावा.
७) पर्यावरण व आरोग्य जनजागृती करता शाळा महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना क्षेत्र कार्य (फिल्ड वर्क ) देण्यात यावे.
८) क्रीडा,कला,कार्यानुभव,संगणक तासिका सक्तीने घेतल्या जाव्यात व त्या विषय शिक्षकांची नियुक्ती तातडीने करण्यात यावी.
९) राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विनाअट सरसकट १००% अनुदान देण्यात यावे.
१०) शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहित धोरण तात्काळ रद्द करण्यात येऊन इयत्ता बालवाडी (अंगणवाडी) ते १२ वी पर्यंतचे शिक्षण सर्वांना मोफत व सक्तीचे करण्यात यावे.
आदी मागण्या सरकार कडे अध्यापकभारती ने निवेदनाद्वारे केल्या असल्याची माहिती संस्थापक शरद शेजवळ यांनी दिली आहे.निवेदनावर सुभाष वाघेरे,शैलेंद्र वाघ,महेंद्र गायकवाड,अमीन शेख,मिलिंद गुंजाळ,संतोष बुरंगे, प्रा.मिलिंद गांगुर्डे,वनिता सरोदे-पगारे,भारती बागुल,अतुल डांगळे,दीपक शिंदे,कुलदिप दिवेकर,सागर पगारे,प्रा.के.एस.केवट,प्रा.नितीन केवट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button