Nashik

दिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल

दिंडोरी नगरपंचायत साठी दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल

नाशिक विभागीय प्रतिनिधी सुनिल घुमरे

। दिंडोरी

नगरपंचायत निवडणूकीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, आज अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक 11 मध्ये माधवराव साळुंखे यांचा अपक्ष अर्ज दाखल झाला आहे. दिंडोरी नगरपंचायत चे 17 प्रभाग आहे , नगरपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी कमी वेळ मिळणार असल्याने कागदपत्र जमवाजमव करण्यासाठी इचुकांची धावपळ सुरू असून शासकीय कर भरणा करत दाखले मिळविण्यासाठी इच्छुकांनी नगरपंचायत कार्यालयात गर्दी केली होती. निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते राजकीय व्यूहरचना आखत आहे. शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी, भाजप ने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे मनसे ही काही जागा लढवणार आहे.स्वबळा सोबतच आघाडीच्या चर्चाही सुरू आहे.

फोटो

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना माधवराव साळुंखे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button