Pandharpur

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ऑनलाईन उखाणा स्पर्धा संपन्न

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये ऑनलाईन उखाणा स्पर्धा संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित पुणे फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये पालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी ऑनलाईन उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मकर संक्रांत हा सण सौभाग्याचा मांगल्याचा सण आहे .या सणाचे औचित्य साधून पालकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती.
प्रशालेतील महिला पालकांच्या कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. मकर संक्रांतीदिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो .संक्रांतीचा सण म्हणजे सौभाग्याचा, मांगल्याचा उत्सव, या वेळी महिलांमध्ये उत्साह असतो.सुगडपुजन, हळदीकुंकू, वान वाटणे, अशा अनेक पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा केला जातो. गुळाचा गोडवा प्रत्येकाबरोबर निर्माण व्हावा कटुता सोडून सर्वांना बरोबर गोड बोला असा संदेश या सणा मधून दिला जातो. हे सर्व जाणून फॅबटेक प्रशालेतील महिला पालकांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.पारंपारीक वेशभूषेत महीला पालकांनी उखाणा प्रशालेच्या लिंकवर अपलोड केला. प्रत्येक उखाण्यामध्ये नाविन्य होते. काही उखाण्यात कोरोना च्या काळामध्ये घ्यावयाची काळजी होती, तर काही उखाण्या मध्ये मराठी महिने सण यांची माहिती होती, तसेच काही उखाण्या मध्ये पतीदेवाबद्दल मुलांबद्दल प्रेम होते. तर काही उखाणेमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचे वर्णन होते . या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ विजया माने, द्वितीय क्रमांक सौ मयुरी कांबळे, तृतीय क्रमांक सौ वर्षा दौंडे,सौ. स्नेहल ताटे, उत्तेजनार्थ क्रमांक सौ शुभांगी गायकवाड ,सौ शीतल बिडवे यांना मिळाला या स्पर्धेचे कौतुक सौ सुरेखा रूपनर यांनी केले तसेच संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रूपनर यांचे मार्गदर्शन लाभले.या स्पर्धेसाठी कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत आँनलाईन स्पर्धा संपन्न झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button