Aurangabad

अरोहन अकॅडमी वैजापूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आॅनलाईन कार्यक्रम संपन्न

अरोहन अकॅडमी वैजापूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आॅनलाईन कार्यक्रम संपन्न

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : वैजापूर शहरातील अरोहन अकॅडमी मध्ये आज भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माष्टमी निमित्ताने आॅनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ. राजीव डोंगरे सर व डॉ. विजया डोंगरे मॅडाम उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका बहार. बी. खान. शिक्षीका अर्चना मॅडाम, सविता मॅडाम, सुवर्णा मॅडाम, अनन्या मॅडाम यांनी परिश्रम घेतले.

द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माष्टमी निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पियुष डोंगरे याने भगवान श्रीकृष्ण, पुर्वा कोकाटे व यांती आसर या दोघींनी राधा, तसेच अंशुल राजपूत याने सुदामाचे पात्र केले. अंशुल राजपूत याने द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण यांची मित्र भेट व मित्र प्रेम कशाप्रकारे आहे याची जाणीव करून दिली. यामध्ये अंशुल राजपूत याने सुदामाची गरिबी आणी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण यांची मैत्री कशी होती याविषयी सुदामाचे पात्र साकारुन मांडले.

सुदामा आणी भगवान श्रीकृष्ण यांच्या भेटीसाठी सुदामाच्या पत्नीने आग्रह केला होता. त्यामुळे सुदामाने श्रीकृष्ण भेट घेतली. यामध्ये द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण आणि एक गरीब ब्राह्मण सुदामा यांची मैत्री कशी होती हे अंशुल राजपूत याने या सुदामाच्या पात्राची भुमिका करून दाखवले. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील संबंध त्याकाळी कसा होता. मित्र प्रेमाचे चीत्र या सुदामाच्या पात्रतेतून करून दाखवले. आजच्या काळात गरीब आणि श्रीमंत यांच्यात समानता असावी अशी मानसिक तयारी यातून आपण सर्वांनी शिकायला हवे. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आॅनलाईन सहभाग घेतला. तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आनलाईन कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button