sawada

ऑनलाइन सभा नियमबाह्य अर्थसंकल्पीय सभेवर विरोधकांचा सभात्याग सभात्याग!

ऑनलाइन सभा नियमबाह्य अर्थसंकल्पीय सभेवर विरोधकांचा सभात्याग सभात्याग!

युसूफ शाहा सावदा

सावदा : येथील पालिकेची सर्वसाधारण सभा दी २६ रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली यावेळी सन २०२१ – २०२२ या वर्षासाठी चा अर्थसंकल्पासह ११ विषयाना सभेत मंजूरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ अनिता येवले या होत्या.
सभा सुरु होताच नगतसेवक राजेंद्र चौधरी व विरोधी पक्ष गटनेते फिरोज खान पठान यांनी शादिखाना हॉल साठी जागेचा विषय काढला व सदर विषय मीटिंग मध्ये का घेन्यात आला नाही. याबाबत विचारणा केली यावरून मुख्याधिकारी दालनात बराच वेळ चर्चा झाली. नगराध्यक्षा यांनी यासाठी आपण स्वतंत्र सभा बोलाउ असे सांगितले. पण विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी याच सभेत सदर विषय महत्वाचा असल्याने, घेणे जरूरी होते, असे सांगितले तसेच सदर सभा ऑनलाइन घेण्यावरुन देखील यावेळी चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांचे सभे विषयी काही आदेश नसताना, देखील सभा ऑनलाइन का घेतली, सभा ऑफलाइन घेता आली असती. असे सांगत विरोधकांनी सभा सोडली.
यानंतर सत्ताधारी गटाचे नगरसेवकांचे उपस्थितीत पुढील सभा घेण्यात आली. सभेत शहराच्या सन २१ – २२ या आर्थिक वर्षाचा सुमारे ६० कोटी रूपयांचा, १८ लाखाची शिल्लकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यात कोणतीही करवाढ सूचविण्यात आली नसून शहर विकासाचे दृष्टिने विविध तरतूदी सूचविण्यात आल्या आहेत,
या नंतर सभेत इतर विषय घेण्यात आले यात शहरात विविध ठिकाणी खड़ी, गिट्टी टाकणे साठी वार्षिक करार करणे, पालिकेची चाँदनी चौक परिसरातील जूनी कन्या शाळा पाडणे, स्वामीनारायण नगर परिसरातील हनुमान मंदिर जवळ शेड उभारने यासह सर्व विषयाना मंजूरी देण्यात आली,
( *चौकट* *विरोधकांची पत्रकार परिषद*)
सभात्याग केल्यानंतर अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी व विरोधी पक्ष गटनेते फिरोजखान पठान यांनी विश्रामगृह येथे एक पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी सदर ऑनलाइन सभा ही जिल्हाधिकारी यांचे विरोधात असल्याचे सांगितले व या विरोधात आपण अपील करू असे सांगितले या बाबत त्यांनी नगराध्यक्षा सौ अनिता येवले यांना एक निवेदन सादर केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button