Yawal

शिरसाड येथे एकास मारहाण यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

शिरसाड येथे एकास मारहाण यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: रजनीकांत पाटील
यावल : साकळी येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील रहिवाशी रविंद्र देवराम धनगर (वय-३५) यास त्याच्या घरासमोरील बालवाडी शाळेजवळ सार्वजनिक जागी आरोपी किशोर अरूण चऱ्हाटे, राजेंद्र नारायण चऱ्हाटे, अरुण सिताराम चऱ्हाटे, वना सिताराम चऱ्हाटे या चौघांनी फिर्यादी रविंद्र धनगर याच्या पत्नीने किशोर चऱ्हाटे यांच्या विरुध्द तहसिलदार यांच्याकडे अर्ज केला होता. म्हणून वाईट वाटल्याने संगनमत करुन चापटा बुक्कयांनी व लाथांनी व दोघं कानांवर व डोळयावर मारहाण व शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी देत गंभीर दुखापत केलेली आहे.

या प्रकरणी आदरणीय महोदय, मारहाण प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भाग ५ गु.र.क्र.१७४/२० कलम ३२५,३२३,५०४,३४ भा.दं.वि‌. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.नि.अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ गोरख पाटील हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button