Dhule

? मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात.. अपघातात एक जण जागीच ठार तर 3 गंभीर जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात.. अपघातात एक जण जागीच ठार तर 3 गंभीर जखमी

हा अपघात सकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान झालेला आहे

अपघात कंटेनर आणि दुधाचा टँकर मध्ये झाला आहे

अँकर-: धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नगावबारी परिसरामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर दुधाचा टँकर व उभा असलेला कंटेनर मध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर तिघाजणांना गंभीर दुखापत झाली असल्याची घटना पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे

कंटेनरच्या किन्नर साईट चा टायर फुटल्याने टायर बदलण्याचे काम सुरू असताना मागून आलेल्या भरधाव वेगाने दुधाच्या टॅंकरने उभा असलेला कंटेनरला जोरदार धडक दिली
धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये दुधाच्या टॅंकरला व उभ्या असलेल्या कंटेनर त्वरित पेट घेतला
या दुर्घटनेमध्ये टायर बदलण्यासाठी उतरलेला इसमाचा चिरडल्या गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला आहे
तर तीन जण भाजून गंभीररित्या जखमी झाले आहेत
जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
जखमींची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे.. असद धुळे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button