Aurangabad

कार हळू चालव म्हणल्यावर अजिंठा येथे एकाचा खून

कार हळू चालव म्हणल्यावर अजिंठा येथे एकाचा खून

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे घरा शेजारून भरधाव वेगाने कार नेणाऱ्या चालकास गाडी हळू चालव म्हटल्याने कार चालकाने रागाच्या भरात लाकडी दांड्याने त्या व्यक्तीला जबर मारहाण केली. मारहाण झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी औरंगाबाद येथे घेऊन जात असतांना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अजिंठा येथे घडली. या घटनेत मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान ( वय 50, रा.अजिंठा ) असे मृताचे नाव असून या प्रकरणात अजिंठा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

अजिंठा येथील जामा मशीदीजवळ असलेल्या एका बोळीत मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान उभे होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने त्याच्या अगदी जवळून गेली. त्यामुळे घाबरलेल्या मोहंमद शफीयोद्दीन यांनी चालक सादिकला कार हळू चालव, मारतो का ? असे ओरडून सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी नागरिकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. दरम्यान, कार चालकाने घरी गेल्यावर घरच्यांना मोहंमद शफीयोद्दीन यांच्यासोबत माझा वाद झाला अशी माहिती दिली. यामुळे कार चालकाचे भाऊ व नातेवाईक शेख जावेदजान, मोहमद शेख, अथर शेख हे पुन्हा घटनास्थळी आले. त्यांनी संगनमत करून मोहंमद शफीयोद्दीन यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.

कार चालक सादिकने हातातील लाकडी दांडा शफीयोद्दीन यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे शफीयोद्दीन ही व्यक्ती रक्त बंबाळ झाली. रक्त बंबाळ अवस्थेतील शफीयोद्दीन यांना नागरिकांनी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी औरंगाबादकडे रवाना केले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अजिंठा परिसरात खळबळ उडाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button