Pune

भादलवाडीत एकाची गळा चिरून हत्या

भादलवाडीत एकाची गळा चिरून हत्या

दत्ता पारेकर पुणे

पुणे : भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील भादलवाडी येथे एकाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४, रा. रावणगाव, इरिगेशन कॉलनी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.याबाबत भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, मयत महेश याची अकोले या ठिकाणी सासरवाडी असून तो रक्षाबंधनासाठी पत्नीसह अकोले गावी आला होता. भादलवाडी गावच्या हद्दीत भीमा नदी जोड प्रकल्प शॉप नंबर 6 जवळील शेत जमीन गट नंबर 132 मधील डम्पिंग यार्ड याठिकाणी दगडामध्ये कामगारांना त्याचा मृतदेह आढळून आला.मयत महेशचा गळा धारदार शस्त्राने चिरून त्याचा खून करण्यात आल्याचे घटनास्थळी दिसून आले आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ नितीन दत्तात्रय चव्हाण याने फिर्याद दिली आहे.

सदर घटनास्थळी बारामती विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देत माहिती घेतली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार पुढील तपास करीत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button