Amalner

शहापूर येथे नाल्यात पडून गाळात फसल्याने एकाचा मृत्यू…

शहापूर येथे नाल्यात पडून गाळात फसल्याने एकाचा मृत्यू…

अमळनेर:- तालुक्यातील शहापूर येथे नाल्यात पडून गाळात फसल्याने ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी सकाळी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत योगेश बालू मिस्तरी यांचे मूळ गाव पाडसे असून गेल्या वीस वर्षांपासून तालुक्यातील शहापूर येथे राहावयास गेले होते. त्यांची फारकत झाल्याने ते एकटे राहत असतं. दि. १४ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहापूर गावाजवळील लवकी नाल्यात प्रांतविधी साठी गेले असता पाय घसरल्याने नाल्यात पडले. गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. लोकांच्या लक्षात आल्याने त्यांना बाहेर काढले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे प्रेत शवविच्छदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादी सुनील मिस्तारी यांच्या फिर्यादीनुसार मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एपीआय जयेश खलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. भास्कर चव्हाण हे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button