Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात एकदिवसीय निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयात एकदिवसीय निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा संपन्न

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपुर : कृषी विज्ञान केंद्र,पाल(जळगांव -१), अपेडा, कार्यालय मुंबई व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर येथे *एक दिवसीय निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा* आयोजित करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. आ. श्री शिरिषदादादादा चौधरी (आमदार,यावल/रावेर विधानसभा क्षेत्र) उपस्थित होते शेतकऱ्यांना संबोधित करताना केळी पिकाचे मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न प्राप्त करावे असे विचार त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मांडले. उद्घाटन समारोहात कृषी विज्ञान केंद्रा तर्फे आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.तांत्रिक चर्चासत्रात डॉ. के बी पाटील (केळी तज्ञ व उपाध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम) यांनी केळी लागवडी संदर्भात निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान विषयी मार्गदर्शन केले तसेच डॉ. सी डी बडगुजर (प्रमुख शास्त्रज्ञ, केळी संशोधन केंद्र, जळगाव) यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर नाविन्यपूर्ण बाबी सह तंत्रज्ञानाची माहिती दिली या कार्यक्रमास अपीडा चे क्षेत्र अधिकारी मा. श्री लोकेश गौतम यांनी अपेडा संदर्भात निर्यातक्षम केळी उत्पादन विषयीचे भूमिका व महत्व विशद केले त्याचप्रमाणे श्री. निखील कुलकर्णी (व्यवस्थापक इंक्युबॅशन सेंटर कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) यांनी कृषी क्षेत्रातील स्टार्ट बाबत मार्गदर्शन केले श्री. किरण जाधव यांनी विविध योजनांविषयी माहिती दिली तसेच केळी पिकापासून प्रक्रिया करावे असे आवाहन केले मा. श्री संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय जळगाव यांनी विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी अधिक उत्पादना करता शासकीय योजनांची मदत घ्यावी व उत्पन्न वाढवावे असे निवेदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश महाजन (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रभारी कृषी विज्ञान केंद्र पाल) यांनी केले.या कार्यशाळेस मा.अजित दादा पाटील(सचिव,सातपुडा विकास मंडळ,पाल), श्री.एम ए चौधरी(प्रकल्प संचालक,आत्मा),श्री.प्रभात दादा चौधरी(सचिव,जनता शिक्षण मंडळ,खिरोदा),श्री.कुर्बान तडवी (उपविभागीय कृषी अधिकारी, जळगांव),श्री. सनी दमानिया(केळी निर्यातदार), परिसरातील केळी उत्पादक व प्रगतिशील युवा शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वैभव पाटील यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. धीरज नेहेते(शास्त्रज्ञ) श्री. शरद वाणी व कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार श्री. अतुल पाटील(शास्त्रज्ञ) यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button