Amalner

प्रगती कोचिंग क्लासेस चे एक दिवसीय हिवाळी शिबिर व अमळनेर कचरा व्यस्थापन प्रकल्पास क्षेत्र भेट.

प्रगती कोचिंग क्लासेस चे एक दिवसीय हिवाळी शिबिर व अमळनेर कचरा व्यस्थापन प्रकल्पास क्षेत्र भेट.

अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध व निसर्गरम्य वातावरणाचा सहवास लाभलेले अंबा ऋषी टेकडी वर आज प्रगती कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे एक दिवसीय हिवाळी शिबिर चे आयोजन करण्यात आले.

या शिबीराचा मुख्य हेतू सूर्योदय दर्शन, सकाळचा गारवा ,योगा, प्राणायाम व विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाऊन विविध खेळ खेळता यावे,पर्यावरण शिक्षण , श्रमदान व श्रमदानातून संपूर्ण अंबऋषी टेकडी वरील विद्यार्थ्यांनी कचरा वेचून आज स्वच्छता मोहीम हाती घेतली व त्यातून संपूर्ण परिसर स्वच्छ करून दाखविला.

यासोबतच प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आधी विषय विद्यार्थ्यांना शिकवित असतांना विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा की आपल्या शहरात निर्माण होणारा कचरा हा कुठे जात असावा ?

त्यांच्या मनातील या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही अमळनेर नगरपरिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मा. प्रशांत सरोदे साहेब यांची भेट घेऊन त्याबद्दल जाणून घेतले असता त्यांनी मार्गदर्शन केले.

त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन व सोन खत व्यवस्थापन आपल्या शहरात कशा पद्धतीने केले जाते हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आज विद्यार्थ्यांच्या समवेत अमळनेर नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पास भेट दिली.

त्याप्रसंगी श्री संदीप संदांशिव सर यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या मनातील विविध प्रश्नांना मोकळी वाट करून दिली.ते म्हणतात की, शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे या ठिकाणी शास्त्र शुद्ध पद्धतीने विलगीकरण केले जाते त्यातून प्लास्टिक, रबर, कागद, पुठ्ठे, खत आदी गोष्टींचे कामगारांच्या मदतीने विलागिकरण केले जाते. त्यासोबत हे काम करतांना कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊनच हे केले जाते व नंतर विविध रसायनाची फवारणी करून कचरा कुजविला जातो तसेच आधुनिक यंत्राच्या साह्याने खत निर्मिती केली जाते त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले.

त्याचप्रमाणे आपल्या शहरातील मैला(शौचालया चा मळ) चे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सोनखत प्रकल्पा ची माहिती दिली व त्या प्रकल्पास भेट देऊन सोन खत निर्मिती कशी केली जाते हे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याचबरोबर त्यातून अजून काय मिळविले जाते ? या विषयी सांगताना त्यांनी सोन खत प्रकल्पातून क्लोरीन कसा वेगळा केला जातो व या प्रकल्पातून निघालेले दूषित पाणी कर्दळी वनस्पती कशी शोषून घेते याचे प्रात्यक्षिक त्यांनी या प्रकल्पातून करून दाखवले.

शहरात निर्माण झालेला कचरा हा कचरा नसून तो अनेक अर्थानी ऊर्जानिर्मितीचा मौल्यवान स्त्रोत आहे याचा प्रत्यय त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आला.

अमळनेर शहरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प असल्याचे मार्गदर्शन करताना सांगितले त्याबद्दल मा. श्री मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रशांत सरोदे सर यांच्या सहकार्यामुळे आम्हाला या क्षेत्रभेटीचा लाभ घेता आला मा. कचरा व्यवस्थापक श्री संदीप संदांशिव यांनी ही मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच त्याबद्दल अमळनेर नगरपरिषदेचे प्रगती कोचिंग क्लासेस च्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद!!

या क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांवर होणारे मूल्य संस्कार आदी गुण शिक्षणातून रुजविता या हेतूने आमच्या क्लास ने आयोजन केले. त्या सोबत स्नेह भोजना चा आस्वाद , नृत्य आदी गोष्टींची लयलूट विद्यार्थ्यांनी केली व तसेच टेकडीवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले.त्याच प्रमाणे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसोबत पालक वर्गातून ही मोठा प्रतिसाद मिळाला व त्यांनी देखील विद्यार्थ्यांना टेकडी पर्यंत पोहोचविण्यास सहकार्य केले यात दादासो कैलास महाजन, दै देशदूत वृत्तपत्राचे प्रतिनिधी राजेंद्र पोतदार ,रविभाऊ माळी, प्राचार्य प्रकाश महाजन सर ,सुनील महाजन, अनिल चौधरी ,आदी पालकांनी सहकार्य केले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रगती कोचिंग क्लासचे संचालक संदिप महाजन सर व अनिल माळी सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button