चिमूर,चंद्रपूर

सारंग दाभेकर यांना एक दिवसाचा पीसीआर

सारंग दाभेकर यांना एक दिवसाचा पीसीआर

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर येथील एका महिलेनी सारंग ऊर्फ पुरुषोत्तम दाभेकर, वय ५१ वर्ष, रा. चिमूर ता. चिमूर जि. चंद्रपूर यांचे विरोधात तिस-यादा पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार चिमूर पोलिसांनी अपराध क्रमांक २५९/२०२० नुसार भा. द. वि. चे ३५४, ३५४ (ड), २९४, ५०९, ५०१ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला दिनाक २३ जुलै २०२० रोजी अटक केली असून चिमूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाचा पीसीआर मंजूर केला असून आरोपी पोलीस कोठडीत आहे.

सविस्तर वृत्त असे की, आरोपी हा नेहमीच फिर्यादीचा पाठलाग करतो व अश्लील भाषेत बोलून तु जर माझे पैसे दिले नाही तर तुमचे मोठे नुसकान करीन अशी धमकी देत असतो. आरोपीचे बदनामीचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे तक्रारकर्त्यास गंभीर आघात झालेला आहे. तक्रारकर्ते फारच घाबरले आहे. आरोपीच्या नामे यापूर्वी चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोनदा तक्रार दाखल करण्यात आली असून त्यात त्याला अटक झालेली आहे. आरोपीच्या विरोधात पंचायत समिती चिमूर येथे सिमेंट अफरातफर प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. त्यासोबत आरोपीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी असभ्य वर्तन केलेले आहे. अशा तक्रारी आरोपी विरोधात दर्ज आहेत. सदर आरोपीमुळे फिर्यादीस जीवाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा व शांतंता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिनांक १४/०५/२०१८ व दिनांक 20/०६/२०१८ नुसार लिहून दिलेल्या स्टम्प व पावतीनुसार आर्थिक संबंध नसल्याचा उल्लेखित लेख असूनही वारंवार सदर आरोपी एका महिलेस मानसिक त्रास देतो ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. अशा आरोपीविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त करणे, महिलेस त्रास देणे, महिलेच्या परिवारास त्रास देणे तसेच संस्थेस जाणूनबुजून बदनामी करणे, अवैध्य सावकारी उद्योग असे आरोप ठेवण्याची मागणी फिर्यादी व जनता करीत आहेत. सदर वृत्त प्रकाशित करण्याकरिता फिर्यादीने प्रतिकिया दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button