Nashik

निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात एक कोटींचे बनावट मध्य जप्त, पोलिस अधीक्षकांनी केला बनावट दारूचा अड्डा उद्ध्वस्त

निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात एक कोटींचे बनावट मध्य जप्त, पोलिस अधीक्षकांनी केला बनावट दारूचा अड्डा उद्ध्वस्त

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात उदय राजे लॉन्स मध्ये बनावट दारूच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची पथकासह धाड ताकत अड्डा उध्वस्त केला सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी 21 जणांच्या पथकासह धाड ताकत सुमारे एक कोटीचा माल जप्त केला आहे मंडप सभागृहात चारी बाजूने ताडपत्री व पत्र च्या साह्याने बंदिस्त करत आत मध्ये 12 ते 15 जणांचे समूह स्पिरिट च्या साह्याने रात्रीच्या वेळेत सर्व प्रकारचा देशी दारू बनवण्याचे काम सुरू होते अशातच पोलीस अधीक्षक यांनी आपल्या ताफ्यासह धाड मारली या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे संजय पाटील प्रभाकर पवार ज्ञानदेव शिरोळे मुनीर सय्यद साळुंखे श्यामराव गडाख बंडू ठाकरे नितीन मंडलिक हनुमंत महाले प्रकाश तुपलोंढे भागवत निकम गणेश वराडे नंदू काळे विश्वनाथ काकड सागर काकड सतीश जगताप मंगेश गोसावी सुशांत मरकड रवींद्र तरले प्रीतम लोखंडे किरण काकड भूषण उनवणे नौशाद शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला
*रात्रीचा खेळ चालू होता*
सदर घटनास्थळ हे मंगल कार्यालय साठी असताना येथे मुख्य व्यासपीठावर बनावट बॉक्स रचले होते तर पाहुणे व जेवणावळी च्या ठिकाणी मात्र स्पिरिट व बनवत दारूचे अंदाजे नऊशे ते हजार बॉक्स मालाचे आढळून आले त्याचप्रमाणे हुबेहूब रिकामे बुच बनवण्याचे साहित्य आढळून आले सदरची कामे रात्रीचे खेळ झाले प्रमाणे होते दिवसा कोणाला काहीच थांगपत्ता लागत नसेल परंतु अंधार पडल्यानंतर सर्व पॅकिंग साहित्य रचून हा उद्योग सुरू होता यामध्ये बाजारातील हुबेहूब पॅकिंग व लेबल साहित्य बघून सर्वजण चक्रावले ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जाते रात्री अकरा वाजता छापा टाकला असता संजय मल्हारी दाते गोङेगाव ता निफाङ यास ताब्यात घेतले आहे तर अधिक चौकशी अंती हा देशी दारू बनावट कारखाना आंबादास विठोबा खरात याच्या मालकीचा उदयनराजे लाॅन्स मध्ये सुरु असल्याचे तपासात समोर आले आहे राञी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button