Amalner

एकाच दिवशी झालेत 10 हजार लोक लसवंत जी एम फाऊंडेशनची अनमोल भेट,ग्रामिणसह शहरात कॅम्प लावून साजरा झाला लसोत्सव

एकाच दिवशी झालेत 10 हजार लोक लसवंत

जी एम फाऊंडेशनची अनमोल भेट,ग्रामिणसह शहरात कॅम्प लावून साजरा झाला लसोत्सव

अमळनेर-कोरोनपासून बचावासाठी “कुठे लस मिळेल का लस”अश्या गयावया करत सामान्य जनतेच्या भटकंती होत असताना भाजपा नेते तथा माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या जी एम फाऊंडेशनच्या माध्यमातून व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने अमळनेर तालुक्यासाठी तब्बल दहा हजार,शंभर कोव्हीशिल्ड लसीचे डोस एकाच दिवशी उपलब्ध झाल्याने ग्रामिण व शहरी भागात कॅम्प लावून लसीकरण करण्यात आले.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष तथा माजी आ स्मिताताई वाघ यांच्यासह टीमने हे अभियान यशस्वीतेसाठी सुयोग्य नियोजन लावून प्रचंड मेहनत घेतल्याने एकप्रकारे “लस आपल्या दारी”आल्याचाच सुखद अनुभव ग्रामीण व शहरी जनतेस यानिमित्ताने आला,आ गिरीश महाजन यांचे संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान असून त्यांचे जी एम फाऊंडेशनचे या क्षेत्रात मोठे नाव आहे,या फाऊंडेशन च्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल 1 लाख 11 हजार कोव्हीशिल्ड चे डोस उपलब्ध झाले होते,माजी आ स्मिता वाघ यांच्या मागणीनुसार अमळनेर तालुक्यासाठी 10 हजार 100 डोस दि 26 सप्टेंबर रोजी सांयकाळी प्राप्त झाले होते त्यामुळे या लसीचे डोस नागरिकांना देण्यासाठी दि 27 रोजी ग्रामिण व शहरी भागात कॅम्प चे नियोजन करण्यात आले यात ज्याठिकाणी नागरिक लसीकरणापासून वंचित असतील त्या भागास प्राधान्य देण्यात आले त्यानुसार ग्रामिण भागात 13 गावात तर अमळनेर शहरात तीन ठिकाणी कॅम्प लावण्यात आलेत,यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात आले,त्यानुसार सकाळी 9 वाजेपासून लसीकरणास सुरुवात करण्यात आली,लोकांनी अतिशय शिस्तीने रांगा लावून कोणताही गोंधळ न घालता लस टोचून घेतली, यादरम्यान स्मिता वाघ या स्वतः दिवसभर आपल्या कार्यकर्त्यांच्या टीम समवेत प्रत्येक लसीकरण केंद्रावर जाऊन आढावा घेत होत्या,त्यामुळे कोणताही गोंधळ झाला नाही प्रत्येक कॅम्प ठिकाणी त्या त्या भागातील भाजप कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य केले.दुपारपर्यंत सर्व कॅम्प चे लसीकरण पूर्ण होऊन प्रत्येकाचे लागलीच रजिस्ट्रेशन देखील करण्यात आले.
दरम्यान शहर व तालुक्यात आतापर्यंत अनेकांचे लसीकरण झाले आहे,परंतु लस घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि टोकन पद्धत असल्याने काही सर्वसामान्य नागरिक वरील प्रक्रिया पूर्ण करू शकले नव्हते त्यामुळे लसीकरणापासून ते वंचित राहिले होते परंतु जी एम फाऊंडेशन च्या सहकार्याने आणि स्मिता वाघ यांच्या मागणीमुळे थेट लस च नागरिकांच्या दारी येऊन पोहोचल्याने लसीकरण झालेल्या संपूर्ण दहा हजार नागरिकांनी आ गिरीश महाजन व त्यांचे जी एम फाऊंडेशन तसेच जिल्हापरिषद विभाग,आरोग्य विभागासह स्मिता वाघ यांचे विशेष धन्यवाद व्यक्त केलेत.स्मिता वाघ यांनी याआधी देखील अनेक गरजू आबालवृद्धाना कोविड उपचारासह लसीकरणासाठी मोठी मदत केली असून यामुळे त्यांचे विशेष कौतुक तालुक्यात होत आहे.
सदर अभियानासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,प्रदेश विधी सदस्य अँड व्ही आर पाटील, प्रदेश युवा मोर्चा चिटणीस भैरवी वाघ पलांडे ,तालुका सरचिटणीस जिजाब राव पाटील, राहुल पाटील, शहर सरचिटणीस राकेश पाटील, विजय राजपूत, शहर उपाध्यक्ष महेंद्र महाजन,देवा लांडगे, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज भोई,शहर युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी, चिटणीस निखिल पाटील, समाधान पाटील, योगिराज चव्हाण आदींचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button