Nandurbar

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा सत्कार

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा सत्कार

नंदुरबार/फहिम शेख

8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, महिला अमंलदार, आरोग्य विभागातील महिला अधिकारी व आशा वर्कर यांचा कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मा. प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी, नंदुरबार कु. मिनल करनवाल यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या वेळी मा.पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील व त्यांच्या पत्नी श्रीमती रचना पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्रीमती वर्षा फडोळ, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, मा. अतिरीक्त अधीक्षक अभियंता श्रीमती कोठारे, मा. पोलीस उप अधीक्षक, आर्थीक गुन्हे शाखा श्री. आत्माराम प्रधान यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.
भारतीय समाज हा सुरुवातीपासुनच पुरुष प्रधान समाज राहिलेला आहे. स्त्रीला फक्त चुल आणि मुल याच दृष्टीकोनातून बघितले जात होते परंतु आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना आपल्याला दिसतात. आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. अगदी एस.टी. बसची चालक ते नासा ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात महिलांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. आजची स्त्री पुरुषांप्रमाणेच आपल्या कुटूंबाचा आर्थिक भार उचलण्यात सक्षम बनलेली आहे. विवाह झालेली स्त्री सासर व आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून तिने निवडलेल्या क्षेत्रात आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. पोलीस दलात महिला पोलीसांचे प्रमाण ही लक्षणीय आहे. पोलीस दलात पोलीस शिपाई ते अनेक मोठ्या पदांवर महिला आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतांना दिसत आहे असे प्रतिपादन कु. मिनल करनवाल यांनी केले.संपूर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराना विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले होते. खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकार युद् पातळीवर प्रयत्न देखील करत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून सरकारने विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून Work From Home ही संकल्पना राबविली गेली होती. अत्यावश्यक सेवा देणारे विभाग वगळता बहुतेक शासकीय कार्यालये ही मर्यादीत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चालू होती. अशावेळी समाजाच्या संरक्षणाची व आरोग्याची जबाबदारी घेतलेल्या पोलीस विभाग आणि आरोग्य विभाग मात्र अहोरात्र मेहनत घेवून Front Line Worker म्हणून आपले कर्तव्य पार पाडत होते. या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या कोरोना महामारीतील कर्तव्यामुळे कोरोना योध्दा म्हणून संबोधले गेले.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता तैनात असलेल्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना कोरोना विषाणुची लागन परंतु कोरोना सारख्या महाभयंकर आजारावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर हजर देखील झाले. अशा कोरोना आजारावर मात करून पुन्हा सेवेसाठी कार्यरत झालेल्या नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 31 महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार, जिल्हा परिषद नंदुरबार येथील 23 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, शहादा तालुक्यातील 14 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, तळोदा तालुक्यातील 12 वैद्यकिय अधिकारी व आरोग्य सेविका, आशा गटप्रवर्तक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील 51 महिला अशा एकुण 119 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामुळे कोरोना महामारीच्या दरम्यान आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे निभावणाऱ्या सर्वच शासकिय विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारे चैतन्य निर्माण झाले. तसेच त्यांना यापुढील काळातही कर्तव्याप्रती निष्ठा व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याचे मत या सत्कारार्थींनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाच्या वेळी मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील व त्यांच्या पत्नी श्रीमती रचना पाटील, मा. प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी, नंदुरबार कु. मिनल करनवाल मा अपर • पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्रीमती वर्षा फडोळ, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री सचिन हिरे, मा. अतिरीक्त अधीक्षक अभियंता श्रीमती कोठारे, मा. पोलीस उप अधीक्षक, आर्थीक गुन्हे शाखा श्री. आत्माराम प्रधान यांचेसह इतर अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button