Ahamdanagar

वडुले येथे वैकुंठवासी सदाशिव भाउ आव्हाड यांच्या पुंण्यतीथी निमित्त भिष्माचार्य ह.भ.प. महादेवबुवा आव्हाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

वडुले येथे वैकुंठवासी सदाशिव भाउ आव्हाड यांच्या पुंण्यतीथी निमित्त भिष्माचार्य ह.भ.प. महादेवबुवा आव्हाड यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी

कानिफनाथाची पांढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे वैकुंठवासी सदाशिव भाउ आव्हाड यांच्या अकराव्या पुंण्यतीथी निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यात अधुनिक भिष्माचार्य म्हणून संबोधले जाणारे ह.भ.प.महादेव बुवा आव्हाड यांचा ८७वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाभाऊ दगडखैर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न झाला. आठवडाभर चाललेल्या या सोहळ्यात सर्व ह.भ.प.गणेश रणमले, सुर्यभान केसभट,बाबासाहेब मतकर, क्रुष्णा रायकर, शिवाजी चौधरी,रविंद्र आव्हाड, ऋषिकेश खोसे यांची किर्तने झाली. शेवटी ह.भ.प. बाळकृष्ण केंद्रे यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक साहेबराव आंधळे,सरपंच बाळासाहेब आव्हाड, माजी सरपंच धर्मनाथ आव्हाड, माजी उपसरपंच सुरेश आव्हाड, ह.भ.प.नवनाथ आव्हाड, अमोल आव्हाड, वैभव आंधळे, मनोज बोरा, मारुती पालवे,गणेश आव्हाड, महेश आव्हाड,भगवान शेंडगे,कोपरे येथील नामदेव आव्हाड यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button