Maharashtra

सुरमाज एजुकेशन & वेलफेयर सोसायटी,चोपड़ा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सुरमाज एजुकेशन & वेलफेयर सोसायटी,चोपड़ा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

प्रतिनिधी लतीश जैन

चोपड़ा: 4 जुलाई सुरमाज एजुकेशन हेल्थ आणि सोशल वेलफेयर सोसायटीच्या वतीने चोपडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
आरोग्य तपासणी या शिबिराचे उदघाटन जळगाव शहराचे मुफ़्ती काज़ी शहर अतिक़ुर्रहमान साहेब व अ. करीम सालार यांच्या शुभहस्थे पार पडले या वेळी फारूक शैख, मुफ्ती साहेब, अ.करीम सालार यांची भाषणे झाली. आपल्या भाषणात करीम भाई सालार यांनी लोकांना आव्हान केले की, कोरोनाला घाबरायचे काहीच कारण नाही. लोकांनी आजाराचे लक्षणे दिसताच घरी उपचार न करता, स्वतः समोर येऊन दवाखान्यात आपले उपचार केले पाहिजे तरच आपण कोरोनाचा पराभव करू शकतो. असे सांगता लोकांच्या मनातील भीती दूर पळवली. तसेच सालार यांनी सांगितले की या कॅम्पला उपस्थित गरजू व गोर गरीबांना मोफत एक्सरे सुविधा अलफ़ैज़ फाउंडेशन जळगाव हे करणार. चोपड्यात शिबिराला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला ६५०-७०० लोकांनी आपली तपासणी केली. शिबिरात जळगावचे डॉ.शोएब शेख,डॉ. इकबाल शेख, डॉ.जावेद, डॉ. मुजीब पिंजरी,डॉ.वसी अहेमद, डॉ.शाहरुख खान,डॉ. रियाज़ बागवान,डॉ. मुद्दसर शेख,डॉ. सादीक मलिक तसेच स्थानिक डॉक्टरांनी तपासणीची जबाबदारी पार पाडली.
शिबिरात प्रमुख पाहुने जळगाव चे अ.अज़ीज़ सालार,अनीस शाह,अय्यूब सर यांची उपस्थिति होती.
हाजी उस्मान शेख, जियाऊद्दीन काज़ी, अबुलेस शेख, डॉ रागिब, सऊद बागवान, एस. बी. नाना, रईस खान यांनी या शिबिराची ज़बाबादारी पार पड़ली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button