Pune

रक्षाबंधन निमित्त चितळे बंधू नी बदलवले नाव..!काय आहे नवीन नाव..!

रक्षाबंधन निमित्त चितळे बंधू नी बदलवले नाव..!काय आहे नवीन नाव..!

पुणे चितळे बंधू हे पुण्यातील एक नावाजलेले एक मिठाई ची फर्म आहे .गेल्या शंभर वर्षांपासून स्वतःची व पुण्याची ओळख असणाऱ्या सुप्रसिद्ध चितळे बंधूं नाव बदलवत आहेत.भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला ‘रक्षाबंधन’ या सणाचे औचित्य साधून चितळे बंधू यांनी आता आपली ओळख नव्या रूपात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

रक्षाबंधन या सणानिमित्त राखीसोबतच मिठाईदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू यांनी यंदा रक्षाबंधनानिमित्त बदल घडवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी एका व्हिडीओद्वारे जाहिरात दिली आहे. सध्या सोशल मिडियावर चितळे बंधू बदललेल्या नावासाठी चर्चेत आहेत.

चितळे हे नेहमीच त्यांच्या अनोख्या जाहिरातींसाठी ओळखले जातात. अशीच एक जाहिरात त्यांनी यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त केली आहे. ही जाहिरात सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.या जाहिरातीमध्ये संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी आणि निर्मिती सावंत अशी प्रमुख कलाकार आहेत. कोरोना काळामध्ये महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातील लाखो सिस्टर्सने असंख्य भावांचं आणि त्यांच्या परिवाराचं रक्षण केलं आहे. म्हणूनच चितळे बंधू मिठाईवाले यांनी यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त आपले नाव बदलून ‘चितळे बंधू भगिनी मिठाईवाले’ असे केले आहे.

चितळे बंधू यांनी सांगितलं की केवळ दर्जेदार प्रॉडक्ट्सचनाही तर सामाजिक भान राखणाऱ्या दर्जेदार जाहिराती हे सुद्धा एक समीकरणच झालेलं आहे. ‘कोरोनामुळे सर्वत्र भयवह परिस्थिती निर्माण झालेली असतानाच माणुसकीचा वेगळाच चेहेरा या काळात झळाळून निघाला! आपल्या जगण्याचा गोडवा ज्यांनी ज्यांनी वाढवला, त्या सगळ्या भगिनींना चितळे बंधूंकडून ही आदराची, प्रेमाची भेट!’

संबंधित लेख

Back to top button