Amalner

अमळनेर मध्ये हिदी दिवस निमित्त शिक्षकांना गुणवंत गौरव सन्मान देऊन सन्मानित….

अमळनेर मध्ये हिदी दिवस निमित्त शिक्षकांना गुणवंत गौरव सन्मान देऊन सन्मानित….

अमळनेर : जी एस हायस्कुल च्या हाॕल मध्ये १४ सप्टेंबर हा दिवस ” राष्ट्रीय हिंदी दिन” चे औचित्य साधुन पंचायत समिती शिक्षण विभाग , अमळनेर तालुका क्रीडा परिषद व जी एस हाय. यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आला.यावेळी अध्यक्ष स्थानी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी श्री. आर डी महाजन साहेब ,तर पाहुणे म्हणून पु. सानेगुरुजी पतसंस्थेचे सचिव व नगांव उपसंरपंच , मुख्याध्यापक श्री. तुषार पाटील सर , अमळनेर हिंदी मंडळाचे अध्यक्ष श्री.आशिष शिंदे सर, सचिव श्री. दिलिप पाटील सर , अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष श्री. एस पी वाघ सर , अमळनेर युवा शा.शि. अध्यक्ष श्री. एन डी विसपुते सर इ. मान्यवरांनी दिप प्रज्वलित करुन प्रतिमा पुजन केले. प्रस्तावना श्रीमती. कविता मनोरे मॕडमानी केली. यावेळी मान्यवरांनी हिंदी दिनाविषयी मनोगत व्यक्त केले.. *यावेळी गुणवंत शिक्षक / शिक्षिका सन्मान पुरस्कार २०२१….श्री.दिपक पवार सर ( मा.वि. लोंढवे ) ., श्री. ज्ञानेश्वर विंचुरकर सर ( माध्य. वि. रणाईचे ) , श्री. नारायण चौधरी सर ( माध्य. वि. निंभोरा ) , श्रीमती, कविता मनोरे ( माध्य.वि. जानवे ), श्रीमती, ( जी एस हाय.अमळनेर ) , श्री. दिनेश मोरे ( जि.प, मुलिंची शाळा मारवड ), इ. शिक्षकांना सन्मानपत्र , ट्राॕफी , शिवशाही वस्र , बुके देऊन गौरविण्यात आले.तसेच यावेळी राज्य व राष्ट्रीय खेळांडुचा सत्कांर करण्यात आला..संपुर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी व सुत्रसंचलन अमळनेर क्रीडा अध्यक्ष श्री. एस पी वाघ सर , कार्याध्यक्ष श्री.संजय पाटील सर , श्री. एन डी विसपुते सर , श्री. डी डी राजपुत सर ,श्री.सॕम शिंगाणे सर ,श्री. प्रंशात वंजारी सर ,रेहान शेख यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button