India

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर च्या किंमती वाढल्या..पहा इतक्या रु नी वाढली किंमत..

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर च्या किंमती वाढल्या..पहा इतक्या रु नी वाढली किंमत..

आज 1 सप्टेंबर रोजी गॅस सिलेंडर च्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 15 दिवसांत विना सब्सिडी एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे.

14.2 किलोग्रॅम असणाऱ्या नॉन सबसिडी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी आणखी 25 रुपये भरावे लागणार आहेत. या किंमती आजपासून लागू होणार आहेत. वाढत्या किंमतीसह दिल्लीत आता घरगुती गॅस सिंलेडर 859 वरून 884 रुपये इतका झाला आहे.
दिल्लीत गॅस सिलेंडरचा नवा दर 884.5 रुपये

मुंबईमध्ये गॅस सिंलेडर दर 884.5 रुपये
कोलकातामध्ये 911 रुपये

चेन्नईत 900.5 रुपये

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. मे आणि जूनमध्ये सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली होती.
दिल्लीत यावर्षात जानेवारीमध्ये चा दर 694 रुपये होता, तो फेब्रुवारीमध्ये वाढून 719 रुपये इतका झाला. त्यानंतर 15 फेब्रुवारीला पुन्हा एकदा दर वाढवण्यात आल्याने सिलेंडरची किंमत 769 रुपये झाली. त्यानंतर फेब्रुवारीमध्येच पुन्हा दुसऱ्यांदा वाढ झाली. 25 फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडर 794 रुपये झाला. मार्चमध्ये दर वाढून 819 रुपये इतका झाला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button