Lonand

कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद मधील कांदा लिलाव व शेळ्या मेंढ्या बाजार गुरुवार दिनांक 19 मार्च ते 31 मार्च अखेर बंद राहणार

कृषी उत्पन्न बाजार समिती लोणंद मधील कांदा लिलाव व शेळ्या मेंढ्या बाजार गुरुवार दिनांक 19 मार्च ते 31 मार्च अखेर बंद राहणार

दिलीप वाघमारे

लोणंद दिनांक 18 मार्च प्रतिनिधी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती चे विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवार दिनांक 19 मार्च ते 31 मार्च अखेर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती आनंत पांडुरंग तांबे सभापती दत्तात्रय बीचुकले उपसभापती यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे कोरणा वी शाळेचा पादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर तात्काळ नियंत्रण करणे विषाणूचा संसर्ग अधिक वाढ होऊ नये व त्यावर जिल्हाधिकारी सातारा तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सातारा व दशरथ काळे तहसीलदार खंडाळा यांच्या आदेश केल्याप्रमाणे वरील निर्णय घेण्यात आला आहे.

आठवडा बाजार भरताना घ्यावयास काळजीबाबत आदेशावरून नागरिकांनी एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लोणंद बाजार आवारातील कांदा बाजार लिलाव तसेच जनावरे व शेळ्या मेंढ्या बाजार धान्याचा बाजार 19 मार्च ते 31 मार्च अखेर बंद राहील तरी खंडाळा तालुक्यातील व पुरंदर फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी संयम पाळावा तरी शेतकरी वर्गाने व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन विठ्ठल सपकाळ सचिव यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button