Nashik

येवला नगरपरिषदेचे वतीने शहरात प्रथमच रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

येवला नगरपरिषदेचे वतीने शहरात प्रथमच रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरीसुनील घुमरे नाशिक विभाग प्रतिनिधीयेवला नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहर संस्थापक राजे रघुजीबाबा शिंदे प्रशासकीय कार्यालयात शिव प्रतिमेस प्रशासक तथा मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्याहस्ते पुष्पहार करण्यात आला. त्यानंतर कोविड 19चे पालन करून प्रथमच अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्या वतीने जी भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत भव्य दिव्य रॅली काढण्यात आली. घोषणांनी रॅली मार्ग दुमदुमून निघाला होता. सदर प्रसंगी पालिकेच्या वतीने प्रथमच वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनें महिला व पुरुष अधिकारी कर्मचारी,कामगार यांना फेटे बांधण्यात आले होते.रॅलीचा शुभारंभ नगरपरिषद कार्यालया पासून सुरू होऊन डी.जी. रोड, खांबेकर खुंट,सराफ बाजार मार्गे टिळक मैदान येथे समारोप झाला.या रॅलीचे स्वागत शहरात विविध ठिकाणी सामाजिक व राजकीय स्तरातून करण्यात आले होते.त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रशासक तथा मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.यावेळी माझी वसुंधरा अंतर्गत शपथ घेण्यात आली. याप्रसंगी उपमुख्याध्यापकारी प्रवीणकुमार पाटील,आदित्य मुरकुटे,अरुण गरुड, सदावर्ते, गंगापुरकर तुषार लोणारी,किशोर भावसार, पवन परदेशी,सुनील जाधव, उदय परदेशी,विलास परदेशी, राजेंद्र दानेज,आय्याज शेख,सुरेश गोंडाळे,नरेंद्र परदेशी,सचिन मापारी,कैलास परदेशी,मोरे,सोमनाथ भुरुक,प्रवीण नागपुरे,प्रशांत पाटील,केशव बिवाल,संजय गोसावी,गोरख झाडे,नितीन लोणारी,नितीन हारके, थोरात,संजय लोणारी,श्री कुटे,ठाकूर,उपेंद्र कुलकर्णी, आदिसह अधिकारी कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button