Pune

दौंड मध्ये भीषण अपघात,अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

दौंड मध्ये भीषण अपघात,अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

दत्ता पारेकर पुणे

Pune : दौंड मधील 160 क्रमांक असलेल्या मनमाड- सांगली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून हा अपघात इतका भीषण आहे की मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचे धड आणि शीर पूर्णतः वेगळे झाले आहे.

महामार्गावरील गजानन सोसायटीच्या जवळील बारामती कडे जाणाऱ्या लेनच्या मध्यभागी गेल्या काही दिवसांपासून चेंबर तुटून तुंबले होते. या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून बॅरिकेट उभे केले होते. या दुचाकीस्वराला रात्रीच्या वेळी बॅरिकेट न दिसल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची बॅरिकेटला जोरदार धडक बसली. हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील दुचाकीस्वराचे शीर धडापासून वेगळे होऊन काही अंतरावर जाऊन पडले. यात एकाजणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button