Nashik

विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था वतीने राष्ट्रीय युवा सप्ताह दिनानिमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न.

विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था वतीने राष्ट्रीय युवा सप्ताह दिनानिमित्ताने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्ननाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक=मराठा विद्या प्रसारक समाजाचे डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय , रूग्णालय व संशोधन केंद्र नाशिक आणि विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत भव्य मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले होते .दि.१२ जानेवारी २०२२ बुधवार रोजी सकाळी ठीक १० ते २ पर्यंत विश्वरत्न बौद्ध विहार, निलगिरी बाग ,औरंगाबाद रोड ,पंचवटी, नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ साहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी अनेक गरजू रुग्णांनी याचा लाभ घेतला .या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे आरोग्य तपासणी करण्यात आले. उपस्थित असलेल्या अनेक मान्यवर तज्ञ डॉक्टरांनी आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले.डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र नाशिक या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व सुख सोयी व वैद्यकीय उपचारांची माहिती दिली. या ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ९७१ आजार आणि १२१ पाठपुरावा सेवांवर मोफत उपचार मिळणार आहेत. यात जवळ जवळ सर्व प्रकारच्या दुर्धर शस्त्रक्रिया, ॲन्जिओप्लास्टी , डायलिसिस यासारखे सर्व प्रकारचे आजार, अपघात यावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाते .यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक ,केसरी शिधापत्रिकाधारक यांना या योजनेचा लाभ मिळतो असे सांगण्यात आले . हॉस्पिटलमध्ये खालील व्याधींवर मोफत इलाज केले जातात ऍन्जिओग्राफी , अँजिओप्लास्टी ,मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिरुग्ण व अपघाती आजार, जठर व आतडे शस्त्रक्रिया ,प्लास्टिक सर्जरी ,स्रीरोग ,बालरोग ,नेत्र विकार व शस्त्रक्रिया , फुप्फुस आजारावरील उपचार, इंटरव्हेशनल रेडिओलॉजी तसेच लहान मुलांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील .
आजच्या शिबिरामध्ये मेडिसिन ,अस्थिरोग ,त्वचारोग व स्रीरोग यांची मोफत तपासणी करण्यात आली .रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत करण्यात आली .या शिबिरासाठी अनेक मान्यवर डॉ. मंडळी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे उद्घाटन मैत्रेय सामाजिक उत्क्रांती बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजेश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी अनेक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. डॉ. प्राज्वल सोलापुरे,डॉ. अंगनमल मुरूंगर, डॉ.गायत्री अवताडे, डॉ.अक्शता साखरे , डॉ.कौशल इंदुरिया ,डॉ. नीतू थिकरे,प्राजक्ता खैरनार ,वैष्णवी शिरसागर ,तेजल महाजन ,किशोरी जाधव ,गांगुर्डे प्रियंका ,भरभराट सचिन ,स्वप्निल कुलकर्णी ,मच्छिंद्र शिंदे या सर्वांनी रुग्णांची तपासणी व औषधोपचार मोफत केले .
शिबिर यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिकचे व्यवस्थापक-विश्वस्त संतोषजी वाळवंटे यांनी मोलाचे परिश्रम घेऊन सर्व डॉक्टरांची व शिबिरार्थी यांची चोख व्यवस्था केली .शिबिर पार पाडण्यासाठी अतोनात परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले .या शिबिरामध्ये परिसरातील १२५ रुग्णांनी लाभ घेतला. विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था नाशिकचे अध्यक्ष साहेबराव वाळवंटे व सर्व कार्यकारी मंडळ या शिबिरासाठी उपस्थित होते ,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button