sawada

सावदा अलकवी उर्दू शाळेत तांदूळ वाटप

सावदा अलकवी उर्दू शाळेत तांदूळ वाटप

प्रतिनिधी.. युसूफ शाह सावदा

अलकवी एज्युकेशन सोसायटी सावदा ता रावेर जि जळगाव द्वारा संचलित खाजगी उर्दू प्राथमिक शाळेत शासनाचे आदेशानुसार इ.1 ली ते 8वी तील सर्व विद्यार्थ्यांना सम प्रमाणात तांदूळ वाटप करण्यात आले.शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शहरी भागातील शाळेत शिल्लक असलेला तांदूळ खाजगी उर्दू प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना नियोजनकरून वितरित करण्यात आले. कोरोना विषाणु चा कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजने चा एक भाग म्हणून राज्यातील सर्व महा नगर पालिका , नगर पालिका , व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावलीतील तरतुदी नुसार सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने बंद ठेवण्या बाबत शासनाने सुचित केलेले आहे.

सावदा अलकवी उर्दू शाळेत तांदूळ वाटपअलकवी खाजगी उर्दू प्राथमिक शाळा सावदा येथे

संस्थेचेअध्यक्ष सै असगर व सचिव अय्युबखान सर , व उपाध्यक्ष युसूफ शाह यांचे हस्ते सम प्रमाणात तांदूळ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सोशल डिसटनसिंग व मास लावुन शिस्त प्रिय पध्दती ने तांदूळ वितरण करण्यात आले. या प्रसंगी लेवा जगत संपादक शाम पाटील व त्यांचे सहकारी शेख साजिद
मुख्याध्यापक जफर खान , शाकिर सर , असद सर , सादिक सर, दानिश सर , सददाम सर व नबीला मॅडम
व शिक्षक वृंद उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button