Amalner

जनजागृती सेवा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांना ऑनलाईन”सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत..अमळनेर येथील पत्रकार ईश्वर महाजन सन्मानित..

जनजागृती सेवा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांना ऑनलाईन”सन्मानपत्र”देऊन गौरवांकीत..अमळनेर येथील पत्रकार ईश्वर महाजन सन्मानित..

मुंबई दर्पणकार आचार्य बाळशास्स्री जांभेकर यांचा जन्म दीवस मराठी पत्रकार दिन म्हणुन साजरा केला जातो.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ.काही नावाजलेली वर्तमानपत्र धन दांडग्या भांडवलदारांची आहेत.पण या डीजिटल युगातही इलेक्ट्रॉनिक मिडीयालाही टक्कर देत काही दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक आपल अस्तित्व टिकवून आहेत.अशा या वर्तमानपत्रांचे संपादक आर्थिक तोटा सहन करुनही आपले वर्तमानपत्र काढत आहेत.सहसा अशा संपादक, पत्रकारांचा शासन दरबारी कींवा नावाजलेल्या पत्रकार संघटना पुरस्कार,सन्मान करत नाही,पण महाराष्ट्रातील पत्रकारांचा सन्मान व्हावा हा जनजागृती सेवा समितीचा उद्देश.त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी पत्रकार दिनी महाराष्ट्रातील संपादक, पत्रकार यांचा सन्मान व्हावा म्हणुन जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने या पत्रकारांना ऑनलाईन”सन्मानपत्र”पाठवुन सन्मानित केलेले आहे.वर्तमानपत्रांचे संपादक,पत्रकार यांना त्यांच्या व्हाटसपनंबरवर ‘सन्मानपत्र’
पाठवुन जनजागृती सेवा समितीचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दील्या आहेत.
मराठी लाईव्ह न्युजचे मुख्यसंपादक ईश्वर महाजन सर गेल्या सतरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात शैक्षणिक सामाजिक ,राजकीय, बातम्यानां यथायोग्य प्रसिद्धी देत असतात .त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांना ईसन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button