India

Omicron Variant: ओमीक्रोन चा नवीन उप प्रकार BA.2 पासरतोय वेगात..!भारताला प्रचंड धोका.!

Omicron Variant: ओमीक्रोन चा नवीन उप प्रकार BA.2 पासरतोय वेगात..!भारताला प्रचंड धोका.!

संपूर्ण जगात ओमिक्रॉन अत्यंत वेगानं पसरत असल्यानं ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणेनं सतर्कतेचा इशारा दिलाय. आत्तापर्यंत करोनाचं नवं स्वरुप असलेल्या ‘ओमिक्रॉन व्हेरियंट’चाही उपप्रकार जन्माला आलाय. या उपप्रकाराला बीए२ (BA.2) असं नाव देण्यात आलंय. ओमिक्रॉनचा हा उप-प्रकार अगोदरपेक्षाही वेगानं पसरण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येतोय.
यामुळे जगाला कोविडच्या नव्या लाटेचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीय. तसंच ओमिक्रॉनच्या उपप्रकाराच्या जन्मामुळे एकाच वेळी दोन लाटांना सामोरं जावं लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सध्या डेन्मार्कमध्ये ओमिक्रॉनचा उपप्रकार बीए२ ची वेगानं वाढ होत असल्याचं दिसून येतंय. २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींपैंकी २० टक्के रुग्णांत हा बीए२ आढळून आला होता. हेच प्रमाण २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात ४५ टक्क्यांपर्यंत वाढलेलं दिसून आलं.
ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेल’नं दिलेल्या वृत्तानुसार, ओमिक्रॉनचा उपप्रकार ‘बीए२’ या स्ट्रेनचे आत्तापर्यंत ५३ रुग्ण समोर आले आहेत. परंतु, अनेक आरोग्य संस्थांकडून हा स्ट्रेन धोकादायक असल्याचं म्हटलं जातंय.
रिपोर्ट्सनुसार, बीए२ व्हेरियंटला नेमका किती फटका बसू शकतो, याची चाचपणी सुरू आहे. करोना हा सतत स्वत:च रुप पालटणारा विषाणू आहे. आताच समोर आलेल्या ओमिक्रॉनचंही स्वरुप बदलल्याचं नुकतंच समोर आलंय. भविष्यातही ते बदलत राहू शकतं. त्यामुळे आम्ही विषाणूच्या ‘जिनोम सिक्वेन्सिंग’कडे सतत लक्ष ठेवून धोक्याची पातळी ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत.
ओमिक्रॉनच्या बीए१ या उपप्रकारानं संक्रमित आढळले आहेत ते पुन्हा बीए२ उपप्रकारानं संक्रमित होण्याचा धोका आहे. अशावेळी करोनाच्या दोन लाटांचा एकत्रित धोका निर्माण होऊ शकतो.
करोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंट आपल्यातील एका विशेष बदलामुळे डेल्टा व्हेरियंटहून वेगळा ठरतो. मात्र, हा बदल बीए२ मध्ये आढळून येत नाही. त्यामुळे त्याची ओळख पटवणं थोडं कठिण आहे.

भारतातही आढळले रुग्ण

उल्लेखनीय म्हणजे, भारतासहीत तब्बल ४० देशांत ओमिक्रॉनचा बीए२ हा उपप्रकार आढळून आला आहे. यामध्ये, डेन्मार्क, भारत, ब्रिटन, स्वीडन आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button