Bollywood

Olympic Efect…Javelin throw च्या नादात पहा काय केलं राखी सावंतने..! मुंबईच्या रस्त्यावरच करत होती सराव

Olympic Efect…Javelin throw च्या नादात पहा काय केलं राखी सावंतने..! मुंबईच्या रस्त्यावरच करत होती सराव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राच्या विजयानंतर राखी सावंतला लागल आहे भालाफेकीचं वेड.

मुंबई सध्या संपूर्ण देशातील नागरिकांवर टोकियो ऑलिम्पिक चा नशा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू (Javelin Throw) नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावलं. तसेच हॉकी मध्येदेखील भारतीय संघाला कांस्य पदक मिळाले त्यामुळे जिकडे तिकडे चक दे इंडिया आणि नीरज ची चर्चा आहे.आता राखी सावंतने यावर काहीही न करणे हे राखीच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नीरजचं कौतुक करत आहेत. नीरजच्या विजयानंतर तर राखी सावंतलाही भालाफेकचं वेड लागलं आहे.

राखी सावंत तिच्या विचित्र व्हिडिओ,फोटो आणि वक्तव्या मुळे कायम चर्चेत असते. सध्या राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ह्या व्हिडिओत ती भालाफेकीचा सराव करताना दिसते आहे. पण तिच्या हातात भाला नाही तर दांडा आहे. मुंबईच्या रस्त्यावर राखी हातात दांडा घेऊन उतरली आणि
नीरजची कॉपी करत राखी भालाफेकीची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. राखीने काठी फेकल्यानंतर नेम चुकला. राखीने फेकलेली ही काठी एका व्यक्तीच्या डोक्यावर जाऊन बसली. भालाफेक सरावाच्या नादात राखी ने एकाचं डोकं फोडलं आहे.अर्थात त्या व्यक्तीला फारस लागलेलं नाही तर हा एक मजेशीर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

बिग बॉस 14 नंतर सतत चर्चेत आहे. सध्या तिचं आणि फोटोग्राफर्स मंडळींचं विशेष पटत असल्याचं दिसून येत आहे. जीम असो फळं-भाजीपाला खरेदी असो, तिच्याभोवती फोटोग्राफर्स मंडळींचा गराडा असतो. अशा वेळी राखी अशी काही विचित्र कृती करते, की त्यामुळे फोटोग्राफर्स, तसंच आजूबाजूच्या लोकांचंही चांगलंच मनोरंजन होतं.

संबंधित लेख

Back to top button