World

Olympic Breaking.. भारताचा तिरंदाज अतनु दास ची चमकदार कामगिरी..

Olympic Breaking.. भारताचा तिरंदाज अतनु दास ची चमकदार कामगिरी..

भारताचा आघाडीचा तिरंदाज अतनू दास याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत धडाकेबाज कामगिरी करत तिरंदाजीमधील कोरियन वर्चस्वाला सुरुंग लावला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अतनू दास याने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या दक्षिण कोरियाच्या ओ जिन्होक याला शूट ऑफमध्ये ६-५ ने पराभूत केले. या विजयासह अतनू दास याने पुरुष एकेरीमधील अंतिम १६ खेळाडूंमध्ये म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

या लढतीत पहिला सेट २६-२५ ने गमावल्यानंतर अतनू दासने जबरदस्त पुनरागमन केले आहे. दोन्ही खेळाडूंमधील दुसरा आणि तिसरा सेट २७-२७ अशा बरोबरीत सुटला. तर चौथ्या सेटमध्ये अतनू याने बाजी मारत हा सेट २७-२२ ने जिंकला. त्यानंत पाचवा सेटही २८-२८ ने बरोबरीत सुटला. त्यानंतर हा सामना शूट ऑफमध्ये गेला. त्यामध्ये ओ जिन्होक याने ९ स्कोअर केला. तर अतनू याने परफेक्ट १० चा निशाणा साधत हा सामना जिंकला.

तत्पूर्वी टॉप ३२ फेरीत अतनू दास याने तैवानच्या डेंग यू चेंग याचा ६-४ ने पराभव केला होता. अतनू याने हा सामना २७-२६, २७-२८, २८-२६, २७-२८ आणि २८-२६ अशा फरकाने जिंकला. डेंग हा यंदाच्या ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या सांघिक गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघातील नेमबाज आहे. मात्र त्याचा दबाव न येऊ देता अतनू याने त्याचे आव्हान परतवून लावले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button