World

ओ बापरे..!चक्क बॉलीवूड ची “देशी गर्ल” विकतेय वडा पाव..!पहा कितीचा आहे एक वडा पाव..!

ओ बापरे..!चक्क बॉलीवूड ची “देशी गर्ल” विकतेय वडा पाव..!पहा कितीचा आहे एक वडा पाव..!

बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सध्या तिच्या रेस्टॉरंटमुळे चर्चेत आहे. न्यूयॉर्कमध्ये प्रियांकाने ‘सोना’ या नावाचं रेस्टॉरंट उघडलं असून तिथल्या भारतीय पदार्थ चांगलेच लोकप्रिय झाले आहे.प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमुळे अमेरिकावासियांना भारतीय पदार्थांची चव चाखायला मिळतेय. वडा पाव,पाणीपुरी, डोसा, कुल्चा यांसारखे लोकप्रिय भारतीय पदार्थ रेस्टॉरंटमध्ये मिळतात.तिच्या या रेस्टॉरंटला आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी भेट दिली आहे. निर्माती लोला जेम्सनेही नुकतीच या रेस्टॉरंटमध्ये हजेरी लावली होती. लोलाने प्रियांकाच्या या रेस्टॉरंटमध्ये वडापावची Vada pav चव चाखली. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला.
बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्राने काही दिवसांपूर्वी अमेरिकेत स्वतःचे भारतीय उपहारगृह सुरू केले आहे. न्यूयॉर्क या शहरात असलेल्या तिच्या या उपहारगृहाचे नाव ‘सोना’ आहे.
बॉलीवुडसोबतच मोठ्या दिमाखात हॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर वावरणाऱ्या प्रियांका चोप्राच्या या उपहारगृहाला चित्रपटसृष्टीतल्या अनेक सिने तारकांनी भेट दिली आहे आणि इथे मिळणाऱ्या पदार्थांची चव चाखून त्यांचे कौतुकही केले आहे.

पहा किती आहे प्रियांकाच्या एका वडापावची किंमत

जर तुम्हालाही प्रियांका चोप्राच्या सोना या उपहारगृहातल्या वडापावची चव चाखायची असेल तर त्यासाठी तुमचे पाकीट भरभक्कमच हवे. कारण या वडापावसाठी आपल्याला 14 अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात साधारण 1 हजार रुपये मोजावे लागतात. मुंबईमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या आणि काटकसरीने जगणाऱ्या लोकांच्या पोटाला आधार देणारा वडापाव आता सातासमुद्रापार जाऊन प्रियांकाच्या उपहारगृहाद्वारे अमेरिकेच्या लोकांच्या मनावरही राज्य करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button