Amalner

अरे बापरे..!चोऱ्यांचे सत्र सुरूच…!अंबाऋषी टेकडीवर चोरी..दानपेटी गेली चोरीस..

अरे बापरे..!चोऱ्यांचे सत्र सुरूच…!अंबाऋषी टेकडीवर चोरी..दानपेटी गेली चोरीस..अमळनेर अंबाऋषी टेकडीवरील मंदिरात चोरी झाली असून मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी चोरून नेण्यात आली आहे. चोराने किरकोळ रक्कम चोरी केली आहे.
अमळनेर शहराच्या चोपडा रोडवरील अंबाऋषी टेकडी येथे मंदिर।असून आता टेकडी ग्रुप आणि शहरातील सुज्ञ नागरिकांच्या मदतीमुळे टेकडीवर वृक्षारोपण करून टेकडीच्या सौंदर्यात व निसर्गरम्य वातावरणात भर घातली जात आहे.शहरातील लोकांचा सतत वावर राहतो. भुरट्या चोराने या मंदिरातील दानपेटी चोरून त्यांतील किरकोळ रक्कम काढून दानपेटी तिथेच फेकून दिली.त्याचप्रमाणे वीज मंडळाच्या सुरक्षा रक्षकाची मोटरसायकल देखील काही अंतरावर फेकलेली आढळून आली.तसेच मोबाईल देखील चोरण्यात आला आहे अशी माहिती मिळाली आहे. पण या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button