Bollywood

अरे बापरे कंगना करणार “राष्ट्रवादी” चा प्रचार..!

अरे बापरे कंगना करणार “राष्ट्रवादी” चा प्रचार..!

दिल्ली बेताल वक्तव्य आणि कृती यामुळे नेहमी प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री कंगना राणावत आता निवडणूक प्रचाराच्या रॅलीत दिसणार आहे. तिने नुकतीच महत्त्वाची घोषणा केली आहे. जो पक्ष राष्ट्रवादी असेल त्याला मी पाठिंबा देईन, असे कंगनाने म्हटंल आहे.
कंगना राणावत आज उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील ठाकूर बांके बिहारी मंदिरात गेली होती. कंगनाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
दर्शन घेतल्यानंतर कंगनाने स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली. पत्रकारांनी कंगनाला निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार असा प्रश्न केला. याला उत्तर देताना कंगना म्हणाली, “मी राष्ट्रवादीचा प्रचार करेन. मी कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही आणि निवडणूकीत जे पक्ष राष्ट्रवादी आहेत त्याच पक्षाला पाठिंबा देईन,” असे कंगनाने म्हटले आहे.

केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी म्हणाऱ्या कंगनाच्या विरोधात काही शीख संघटनांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.ती नुकतीच पंजाबला गेली असता पंजाबमध्ये कंगनाच्या गाडीला काही शेतकऱ्यांनी घेराव घालून मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.

पंजाबमध्ये प्रवेश करताच शेतकऱ्यांना माझ्या गाडीवर जमावाने हल्ला केला. हिमाचल प्रदेशातून पंजाबमध्ये पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी तिच्या कारला घेराव घातला. ते स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत आहेत आणि माझ्यावर हल्ला करत आहेत, घाणेरड्या शिवीगाळ करत आहेत, मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. या देशात मॉब लिंचिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. आज पोलीस नसते तर माझंही मॉब लिचिंग झालं असतं असं तिनं म्हटलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button