Maharashtra

ओ शेठ गाण्याचा वाद अखेर मिटला..!उमेशने माघार घेत केली तडजोड..!

ओ शेठ गाण्याचा वाद अखेर मिटला..!उमेशने माघार घेत केली तडजोड..!

ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला. अत्यन्त कमी वेळात हे गाणं प्रसिद्ध झाले.सोशल मीडियावर या गाण्याचे असंख्य मीम्स आणि इन्स्टाग्रामवर रिल्स प्रचंड व्हायरल झाले. प्रेक्षकांनी या गाण्याला भरभरून दाद दिली. या गाण्यामुळे संध्या केशे, प्रनिकेत खुणे आणि उमेश गवळी यांना अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागला.
काही दिवसांपूर्वी या गाण्याच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला होता. अखेर या गाण्याचे गायक उमेश गवळी यांनी माघार घेत तडजोड करून संध्या आणि प्रणिकेत शी जोडून घेतलं आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ओ शेठ गाण्याला संगीत देणारे संध्या आणि प्रनिकेत यांनी गायक उमेश गवळी यांच्यावर गाणं चोरी केल्याचा आरोप केला होता. या गाण्याला संगीतबद्ध करणारे संध्या-प्रनिकेत यांच्या यूट्यूब चॅनेलवर उमेश गवळी यांनी स्ट्राइक टाकला होता.आणि ही तक्रार संध्या प्रणिकेत ने केली होती.
उमेशने लावलेला हा स्ट्राइक काढावा, अशी मागणी या दोघांनी केली होती.शेवटी त्यांची मागणी मान्य करत उमेशने माघार घेत वाद मिटवला आहे.
तर ओ शेठ इज बॅक असं म्हणत गाण्याचे संगीतकार संध्या केशेंनी महाराष्ट्राचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button