Rawer

निंभोरा स्टेशन येथे असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शाखेचे उदघाटन संपन्न.

निंभोरा स्टेशन येथे असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, शाखेचे उदघाटन संपन्न.

निंभोरा-संदिप को ळी

येथील वॉर्ड क्रमांक ०६मध्ये न्यू एकता नगर भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.व या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी माजी आ अरुण पाटील,किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,माजी जिप गटनेते तथा माफदा चे अध्यक्ष विनोद तराळ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,राष्ट्रवादी युवक चे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील,पं स सदस्य दीपक पाटील,सोशल मीडिया कार्यध्यक्ष तथा तालुका सरचिटणीस वाय डी पाटील,माजी पं स सदस्य प्रमोद रझोतकर,ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,माजी सरपंच तथा तंटामुक्ती चे अध्यक्ष डिगंबर चौधरी,युवक चे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे तालुका उपाध्यक्ष शेख असलम,निंभोरा सरपंच सचिन महाले,ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील,दिलशाद शेख,मनोहर तायडे,राजीव बोरसे,आशिष बोरसे,विशाल तायडे,अर्षद पिंजारी,हर्षल ठाकरे,किरण कोंडे,राज खाटीक,आदी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविकात बापूसाहेब रजाने यांनी एकता नगर मधील रहिवाशांच्या समस्या मांडत सर्वांनी एकविचाराने राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला.यावेळी बापूसाहेब रजाने यांच्या सोबत आलमगीर खान ,रइस खान,रविंद्र चव्हाण, मुस्ताक खांन, विशाल मोरे, अभिषेक सपकाळे,विनोद मोरे, प्रमोद मोरे. वाहिद खान,फिरोज खान,सलमान खान,बंटी सुरवाडे, गणेश महाजन,रविंद्र तायडे,
रुक्साना बी रइस खान,उज्वला रजाने,कलिका रजाने,मोना बी वाहीद खान आदींनी प्रवेश केला.यावेळी वाय डी पाटील यांनी माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या जीवन पट सांगितला.रवींद्र पाटील,अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना प्रल्हाद बोंडे यांनी या भागातील समस्यांसाठी वेळोवेळी लक्ष पुरवून मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पक्षप्रवेशाबद्दल शुभेच्छा देत समस्या सोडविण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.सूत्र संचालन बाळा चव्हाण यांनी तर आभार रईस खान यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button