Rawer

आता स्वामालकीची होणार ग्रामपंचायत ईमारत – सरपंच सचिन महाले

आता स्वामालकीची होणार ग्रामपंचायत ईमारत – सरपंच सचिन महाले

संदिप कोळी ता रावेर

निंभोरा बु – येथील ग्रामपंचायत गेल्या काही वर्षापासून भाडे तत्वाच्या जागेवर चालत असून आता स्वमालकीच्या जागेत थोड्या दिवसात स्थलांतर होणार असल्याचे सरपंच सचिन महाले यांनी सांगितले निंभोरा ग्राम सचिवालय ईमारत साठी स्व.बाळासाहेब ठाकरे ग्राम सचिवालय निधी प्राप्त करून देण्यास प्रयत्नशील असलेले माजी उपसरपंच विवेक ठाकरे , माजी प्रभारी सरपंच सुभाष महाराज यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून जागेचे भूमिपूजन करत असताना सरपंच ,उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी यांचे आभार मानले तसेच याचप्रकारच्या विविध योजना निंभोरा गावात खेचून आणण्यास सर्वांच्या परीने प्रयत्नशील राहू असे सरपंच यांनी थोडक्यात सांगितले याचवेळी गावातील ग्रामस्थांनी देखील सरपंच यांनाआशिर्वाद रुपी शुभेच्छा देऊन सरपंच यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली यावेळी उपस्थित सरपंच,उपसरपंच,सदस्य,ग्रामविकास अधिकारी तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर हजर होते…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button