Paranda

परंडा गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणी पाच जनांना नोटीस

परंडा गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणी पाच जनांना नोटीस

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि १६

परंडा येथील गट शिक्षण कार्यालयातील टीव्ही चोरी प्रकरणात प्रभारी गट शिक्षण आधिकारी श्रीमती जगदाळे यांनी ५ कर्मचाऱ्यांना नोटीस बजाऊन तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे .

वरिष्ठ आधिकाऱ्यांशी व्हीडीओ द्वारे संवाद साधन्या साठी टिव्ही संच देण्यात आला होता मात्र हा टीव्ही संच १ वर्षा पुर्वीच कार्यालयातून गायब झाले होते तरीही तत्कालीन प्रभारी गटाशिक्षण आधिकारी खूळे यांनी या गंभीर प्रकरणा कडे दुर्लक्ष केल्याने अद्याप पर्यंत या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली नसल्याने टिव्ही च्या विषयाचा विसर पडला होता .

मात्र तब्बल एक वर्षा नंतर टिव्ही गायब झाल्याची चर्चा कार्यालयात पुन्हा झाल्याने टिव्ही चोरी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या व खळबळ उडाली या मुळे टिव्ही चोराने दि १५ जुलै रोजी सायंकाळी ५-३० वाजेच्या सुमारास चोरलेला टिव्ही कार्यालयाच्या मागील बाजुस च्या सरंक्षण भींती जवळ गपचूप ठेऊन पोबारा केला .

अज्ञात चोरोने टिव्ही आणुन ठेवल्याचे कर्मचारांच्या निदर्शनास आल्यावर टिव्ही कोणी तरी आणून ठेवल्याचे कळवीन्यात आले . या गंभीर विषयाची प्रभारी गट शिक्षण आधिकारी श्रीमती जगदाळे यांनी दखल घेऊन तत्कालीन प्रभारी गट शिक्षण आधिकारी ए.आर खुळे, तत्कालीन गटसमन्वयक एस.बी हाके , कनिष्ठ सहाय्यक ए.एल.
महानवर , लेखा विभागाचे वरिष्ठ सहाय्यक आर .एम कांबळे , शालेय पोषण अहार विभागाचे डी .एम बोंडगे या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दि १६ जुलै रोजी नोटीस काढण्यात आली आहे .

कर्मचाऱ्यांना काढण्यात आलेल्या नोटीसी मध्ये म्हटले आहे की सदर टिव्ही संच कोणत्या योजनेतुन व कोणत्या कार्यालया कडून कोणत्या वर्षी प्राप्त झाला आहे .
स्टॉक बुकला नोंद आहे का नसेल तर का नाही . तसेच टिव्ही संच आपल्या ताब्यात असताना बाहेर कसा गेला केव्हा गेला व कोणाच्या परवानगीने गेला .
मधल्या काळात कोणाच्या ताब्यात होता टिव्ही चोरीची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली होती का व कार्यालयाच्या परवानगी शिवाय परस्पर हस्तांतर कसा झाला याचा खुलासा नोटीस मिळताच तात्काळ दाखल करावा असा आदेश देण्यात आला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button