sawada

त्या अनधिकृत इमारत व तळघर संदर्भात सावदा पालिकेने दिली नोटीस

त्या अनधिकृत इमारत व तळघर संदर्भात सावदा पालिकेने दिली नोटीस

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे शहराच्या मुख्य रस्त्यास लागून अनधिकृत इमारत व त्याच्या भुतळा वर अवैध तळघर संदर्भात शहरातील एका जागरूक नागरिक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावदा पालिका प्रशासनाने जास्तीचे बांधकाम काढणेबाबत इमारत मालकास सक्तीची नोटीस बजावलेली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावदा नगरपालिकेच्या क्षेत्रात शहराच्या मुख्य हमरस्त्याला लागून मंजूर नकाशाप्रमाणे न बांधण्यात आलेली अनधिकृत इमारत व त्याच्या भूतळावर अवैध तळघर देखील बांधलेला असून यासंदर्भात एका जागरूक नागरिकांनी सावदा पालिकेस दिलेल्या तक्रारीवरून इमारत मालक सुरेश कुमार दिपचंद अमरनाणी यांना जास्तीचे विनापरवानगी केलेले बांधकाम १५ (पंधरा) दिवसात काढण्यात यावे व त्याबाबत आपला खुलासा देखील पालिकेत सादर करावा अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२,५३,५४, अन्वे पुढील कारवाई करण्यात येईल सदरची होणारी कारवाईस सह खर्चास व परिणामास इमारत मालक जबाबदार राहील असे दिलेल्या नोटिशी द्वारे सूचित करण्यात आले आहे.

“मात्र सावदा नगरपालिकेतर्फे देण्यात आलेली नोटीस मध्ये एमआरटीपी कायद्याअंतर्गत अनधिकृत बांधकाम विरुद्ध कारवाईसाठी शासन निर्णय दिनांक ३/२/२०१८ नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई या शासन परिपत्रकात असलेल्या सूचना व कार्यपद्धती मध्ये नमूद १) मधील कलम २६०,२६७ व २६७ (अ) याचा उल्लेख दिसून आलेला नाही. हे संशोधनाचा भाग आहे.”

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button