Amalner

निविदा नाही..! अधिकृत परवानगी नाही तरीही नूतन मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण जोरात..!नवा भिडू नवा राज..!नवे अधिकारी नवे बांधकाम..!नगरपरिषद की जय ..!

निविदा नाही..! अधिकृत परवानगी नाही तरीही नूतन मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण जोरात..! नवा भिडू नवा राज..!नवे अधिकारी नवे बांधकाम..! नगरपरिषद की जय ..!

अमळनेर येथील मुख्याधिकारी निवासस्थानाचे नूतनीकरण नूतन मुख्याधिकारी यांच्यासाठी जोरात सुरू आहे..मागील मुख्याधिकारी यांच्या वेळी देखील सतत ह्या निवासस्थानाचे कार्य सुरू होते.विशेष म्हणजे जुने मुख्याधिकारी बदलून जाई पर्यंत निवासस्थानी काम सुरू होते.आता नुकताच नूतन मुख्याधिकारी यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार सांभाळला आहे.आता पुन्हा इथे जोरात नूतनीकरण सुरू आहे.लाखो रुपये खर्च करून हे नूतनीकरण सुरू आहे. या नुतनीकरण कामाची कुठलीही निविदा न काढता नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. हा आर्थिक भार कुणाच्या पैशातून काढला जातो आहे? एकीकडे कोरोनाने सर्वांचे आर्थिक कंबरडे मोडलेले असतांना कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अशी ख्याती असलेले व नुकतेच अमळनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले प्रशांत सरोदे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणाची कुठलीही निविदा न काढता लाखो रुपयांचे नूतनीकरणाचे काम सुरू केल्याची चर्चा अमळनेर मध्ये रंगते आहे खरंच या निवासस्थानी मूलभूत सोयी सुविधा यांचा अभाव होता का ? कोरोना सदृश्य अशा भयावह व बिकट परिस्थितीत निवासस्थानी नुतनीकरण करणे व लाखो रुपयांचा अपव्यय करणे एवढे जिकरीचे होते का ? अशा एक ना अनेक चर्चा शहरातील नागरिकांमध्ये रंगल्या आहेत.

शासनाचे नियम जसे नागरिकांना लागू होतात तसेच ते प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गालाही लागू होतात. मग लॉकडाऊन चे नियम मोडले म्हणून व्यापारी वर्गाला झालेला त्रास, त्यांच्याकडून दंडापोटी वसूल करण्यात आलेली रक्कम याचा विसर एवढ्या लवकर कसा काय पडला आहे का? शासकीय कर्मचारी अधिकारी लोकहिताचे काम करतात सेवा पुरवितात त्यांना मूलभूत सोयी सुविधा मिळाल्याचं पाहिजे पण नियम धाब्यावर बसवून नको अशी अमळनेर च्या जनतेची सार्थ आणि माफक अपेक्षा आहे.तुम्ही च जर असे बेशिस्त वागलात तर जनतेकडून इतर कोणतीही शिस्तीची आणि नियमांची अपेक्षा ठेवू नका असे ही जनतेतून मत व्यक्त केले जात आहे.

संबंधित लेख

Back to top button