Faijpur

संजय गांधी योजनेच्या सदस्य पदी नितीन महाजन यांची निवड झाल्याने दशमाता ग्रुप तर्फे सत्कार

संजय गांधी योजनेच्या सदस्य पदी नितीन महाजन यांची निवड झाल्याने दशमाता ग्रुप तर्फे सत्कार

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर येथील दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन यांची संजय गांधी निराधार योजनेच्या तालूका सदस्यपदी निवड झाली. शहरातील दशमात ग्रुप तर्फे महाजन यांचा सत्कार करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या
नितीन महाजन यांची निराधार योजनेत जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केलेबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री.गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच दिव्यांग प्रतिनिधीच्या नावाला शिफारस केलेबद्दल यावल- रावेर विधानसभेचे आमदार मा. शिरीष चौधरी व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी निवड केलेबद्दल आभार व्यक्त केले. फैजपूर गावासह तालुक्यातील दिव्यांग व निराधार व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहु असे नितीन महाजन यांनी सांगितले.

शहरातील दशमाता ग्रुप चे अध्यक्ष सौ किरण कोल्हे, संजय चौधरी, गौरव चौधरी, ललित वाघूळदे,प्रविण कोल्हे,गोपाळ चौधरी,विनोद गलवाडे,ऊमेश वायकोळे,गौरव चौधरी,देवद्रं चौधरी,जयश्री चौधरी, निलेश पटील,उत्कर्षा चौधरी,साक्षी चौधरी, नाना मोची व दशमात ग्रुप सदस्य उपस्थित होते.
दशा माता ग्रुप.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button