Amalner

Amalner: जुनी पेन्शन योजना लागू करा..जुनी पेंशन हक्क संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

Amalner: जुनी पेन्शन योजना लागू करा..जुनी पेंशन हक्क संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

अमळनेर(प्रतिनिधी):- नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय व निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार नवनाथ लांडगे यांना निवेदन देण्यात आले.
२००५ नंतर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन अंशदान पेन्शन योजना लागू करण्यात आली, यामुळे मात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून हा अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ जुनी पेन्शन योजना बहाल करावी ही विनंती करण्यात आलेली आहे.देशातील राजस्थान, पंजाब,झारखंड,छत्तीसगड राज्यांनी आपल्या धोरणात बदल करत पूर्ववत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात पाऊले उचलायला सुरवात केली आहे.जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर राज्यामध्ये लागू करावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जुनी पेंशन हक्क संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष डॉ.कुणाल पवार,जिल्हा संघटक उमाकांत हिरे,तालुकाध्यक्ष सुशील भदाणे,उपाध्यक्षा पाकिजा पिंजारी,शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील,
तालुकाध्यक्ष विशाल वाघ,कार्याध्यक्ष रोहित तेले,टीडीएफ चे सचिव राहुल पाटील,अ.म.प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला तालुकाध्यक्षा श्रीमती क्रांती पाटील,उपाध्यक्षा श्रीमती सीमा पाटील,आफरिन बानो, अस्मा परवीन अशपाक अहमद,एन.आर.पाटील,प्रशांत काटकर,सचिन अहिरे,संदीप बनसोडे,एच.एस.चौधरी,विजय पाटील,जगदीश राजपूत आदी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button