Rawer

निंभोरा इंदिरा नगर लहुजी क्रांती सेना तर्फे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

निंभोरा इंदिरा नगर लहुजी क्रांती सेना तर्फे लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

खिर्डी ता रावेर प्रविण शेलोडे
बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती निंभोरा येथे लहुजी क्रांती सेना निंभोरा तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
निंभोरा येथील सरपंच सचिन भाऊ महाले सोबत ज्येष्ठ पत्रकार राजू बोरसे यांनी प्रतिमेचे पुजन करुन आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर बिऱ्हाडे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,” अण्णा भाऊ साठे भारताला लाभलेले मोठे रत्न आहे.त्यांनी आपल्या जीवन काळामध्ये अनेक कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये “फकीरा” कादंबरीचा सामाविष्ट आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाज कार्य करत असताना,
” ये आझादी झुठी है देश कि जनता भुखी है”
ही घोषणा दिली होती.अण्णाभाऊंनी अनेक मोर्चामध्ये सहभाग घेतला समाजातील प्रत्येक घटकास न्याय मिळावा ही त्यांची इच्छा होती ह्या असामान्य व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे असे विचार मधुकर बिऱ्हाडे सर यांनी यांनी व्यक्त केले.सदर जयंती कार्यक्रमा प्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सुनंदा बिऱ्हाडे , सौ.शाहीन दस्तगीर खाटीक ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गिरडे, तसेच विविध मान्यवर व मातंग समाजाचे समाधान दांडगे , दिलीप सोनवणे, काशिनाथ सपकाळे, गजानन सोनवणे, शंकर सोनवणे, विष्णु उबाळे, विष्णू सोनवणे,मयूर सपकाळे, अमोल दांडगे, , भगवान सोनवणे, नलिनी सोनवणे, सुरेखा दांडगे, अंजनाबाई सोनवणे, सिंधुबाई सोनवणे आधी महिलांसह बालगोपाळांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे यांनी केले तर आभार समाधान दांडगे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button