Nilanga

निलंग्यात मुस्लीम समाज रमजान ईद साजरा करणार नाही.

निलंग्यात मुस्लीम समाज रमजान ईद साजरा करणार नाही.

सलमान पठाण

निलंगा:- कोरोना विषाणूचा प्रादुभाव रोखण्यासाठी व संपूर्ण देशाच्या हितासाठी समस्त मुस्लीम समाजाने यावर्षी रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात जे वेळेनुसार मार्केट उघडे आहेत, जर हे मार्केट फक्त मुस्लीम समाजाच्या रमजान ईदसाठी उघडत असतील तर समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने स्वखुशीने ते मार्केट बंद करण्यास आमची परवानगी आहे. आम्ही यावर्षी ईद गोरगरीब जनतेला होईल तशी मदत करून साजरी करणार आहोत.
सोबतच शहरातील सर्व मस्जिद वरील लाऊडस्पीकर वर कोरोना विषाणूचा प्रादुभाव रोखन्यासाठी योग्य ती खबरदारी व सूचना देण्यासाठी परवानगी देण्यात यावी ज्यामुळे जनतेमध्ये योग्य जागरूकता निर्माण होऊन कोरोनाच्या वाढत्या प्रसारास आळा बसण्यास मदत होईल. अशा मागणीचे निवेदन समस्त निलंगा मुस्लीम समाजाच्या वतीने देण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button