Bollywood

रेखा अमिताभ च्या नात्याबद्दल नवीन खुलासा..!पहा कोण काय म्हणालं..!

रेखा अमिताभ च्या नात्याबद्दल नवीन खुलासा..!पहा कोण काय म्हणालं..!मुंबई बॉलिवूड मधील अत्यन्त गाजलेली जोडी म्हणजे रेखा अमिताभ..!ह्या दोन्ही कलाकारांच्या बद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चेत असते. रुपेरी पडद्यावरील पात्र असो किंवा खऱ्याखुऱ्या जीवनातील त्यांचं नातं असो, चर्चा कायमच झाली आणि आजही होते. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्यातील अनेक गोष्टी लोकांना माहीत नाही. आणि उत्सुकता देखील असते.नुकतेच या नात्यातील एक मोठा उलगडा सर्वांसमोर झाला आहे.

अभिनेत्री हेमा मालिनी आणि रेखा या दोघीही अतिशय चांगल्या मैत्रिणी आहेत.अमिताभ बच्चन यांच्याशीही हेमा यांची चांगली मैत्री आहे. मैत्रीच्या याच नात्याखातर हेमा मालिनी या रेखा आणि बिग बी यांची भेट घालण्यास तयार झाल्या होत्या. या साऱ्यासाठी त्यांनी एका राजकीय नेत्याची मदतही घेतल्याची माहिती मिळाली आहे.

यासिर उस्मान लिखित एका पुस्तकामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. पुस्तकात हेमा मालिनी यांनी रेखा आणि अमिताभ बच्चन यांचं नातं रुळावर आणण्यासाठी अमर सिंह यांची मदत घेतली होती. अमिताभ हे सिंह यांचे चांगले मित्र होते, ज्यामुळे त्यांनी या नात्यासाठी हा एक प्रयत्न केला होता. पण, पुढे नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button