Karad

कराडमधील नवीन शासकीय आदिवासी वस्तीगृहाची इमारत बदला – बिरसा क्रांती दल मागणी, आदिवासी विद्यार्थ्यांना धोकादायक

कराडमधील नवीन शासकीय आदिवासी वस्तीगृहाची इमारत बदला – बिरसा क्रांती दल मागणी, आदिवासी विद्यार्थ्यांना धोकादायक

कराड / प्रतिनिधी – अभिजित भालचिम

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह मलकापूर कराड येथे बिरसा क्रांती दलाची बैठक पार पडली.
त्यावेळी बिरसा क्रांती दल पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, सह्यादी आदिवासी कर्मचारी असो सांगली चे कार्याध्यक्ष एस. पी. जोशी, सुरेश भोईर, सिताराम वाळकोळी, गृहपाल कदम आदी विद्यार्थी उपस्थित होते.
वसतीगृहातील विद्यार्थी म्हणाले, कराडवस्तीगृहाची इमारत ही ६ कोटी ७० लाख किंमतमध्ये खरेदी केली. पण ही इमारत स्मशान भूमीला लागून आहे. काँलेज पासून वस्तीगृह अंतर हे १५ किलोमीटर दूर आहे. जवळ बस, रिक्षा किंवा इतर कोणत्याही वाहन मिळत नाही. दवाखाना नाही. प्राथमिक सोई सुविधा नाही. ही वस्तीगृह इमारत च्या बाजूला इतर सोसायटी असून एकच गेट चा वापर सर्वांना करावा लागत आहे. त्यामुळे हे नवीन वस्तीगृह आदिवासी मुलांना धोकादायक आहे. मुले आंदोलन करत होती तेव्हा सहाय्यक प्रकल्प अधिकारी कालेकर हे शासकीय विश्राम गृहात मुक्काम करत होते पण मुलांना भेटायला आले नाही मग त्यांनी कशा प्रकारे अहवाल तयार केला आहे.

आंबवणे म्हणाले, जर का आदिवासी मुलांना या नवीन इमारत मध्ये आजूबाजूच्या लोकांनी त्रास दिला. किंवा काही तक्रारी पोलिस ठाण्यात केली तर आम्ही ते सहन करणार नाही असा इशारा गृहपाल कदम यांना दिला. नवीन इमारत तीन महिन्यात बंद करून काँलेज जवळ घ्या. जर का लवकरात लवकर इमारत बदली झाली पाहिजे. नाहीतर या इमारतीत होणार त्रास मुले सहन करणार नाही. पहिल्या दिवशी पासून मुलांच्या तक्रारी लोकं करत असतील तर हे आदिवासी मुलांना धोका निर्माण करणारी आहे. त्यामध्ये गृहपाल म्हणून तुम्हाला आम्ही जबाबदार धरू हे लक्षात ठेवा. बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी ठाणे जिल्ह्यात झालेल्या बैठकीत आदिवासी मंत्री महोदय अँड. के. सी पाडवी यांना कराड वस्तीगृह विषय काढला तेव्हा प्रकल्प अधिकारी यांनी मंत्री महोदय पी. ए यांच्या कडे असा निरोप दिला की वस्तीगृह ची इमारत ही मुलांना दाखवून घेतली आहे पण हे उत्तर मुलांनी खोटे आहे असे सांगितले, तर मंत्री महोदय यांनी मुलांना बस ची व्यवस्था करायला सांगितले आहे.असा मँसेज बिरसा क्रांती दल संस्थापक दशरथ मडावी यांनी मला पाठवा आहे असे आंबवणे म्हणाले.

एस. पी. जोशी म्हणाले, जर का अप्पर आयुक्त ठाणे जर का मुलांना सायकल देत असतील तर पहिले सुरवात आयुक्त पासून करू व आयुक्त यांना सायकल चालवायला सागू. सर्व मुलांनी २० दिवस आंदोलन करून जर का हे आदिवासी विकास विभाग जर झोप सोग घेत असेल तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र जुडी व सहाय्यक प्रकल्प अधिकारी कालेकर यांच्यावर गुन्हे दाखल करू.
कदम म्हणाले, आम्ही तात्काळ बसची सोय करुन देत आहे मुलांनी सहकार्य करावे. काँलेज वेळ आम्हाला दिला पाहिजे. वस्तीगृहामध्ये ओळख पत्र जाताना येताना सोबत गेटवर दाखवले पाहिजे. मुलांनी वाढदिवस रात्री १२ वाजता साजरा न करता ८ किंवा ९ वाजता केला पाहिजे. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही.

वस्तीगृहातील विद्यार्थी डगळे म्हणाला, आम्ही वस्तीगृह कार्यालयाला लवकरच टाळे ठोकणार आहे. आम्ही रोज काँलेज जाणार आमचा अभ्यास करणार आहे. आता प्रशासनाने आमची भेट घेतली पाहिजे आता आम्ही खूप लोकांना भेटलो निवेदन दिले. आता आदिवासी विकास विभागाचे अधिकारी वस्तीगृहामध्ये आले पाहिजे.

Leave a Reply

Back to top button